Ladki Bahin April Installment: लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये! सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin April Installment: राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती, आणि या योजनेअंतर्गत सुमारे 2.74 कोटी महिलांना लाभ मिळत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून ही योजना सुरू केली होती, ज्याअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये मिळत होते.

मात्र, आता या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार काही महिलांना यापुढे केवळ 500 रुपयेच मिळणार आहेत. कोणत्या महिलांना हा बदल लागू होणार आहे आणि यामागील कारण काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

Ladki Bahin April Installment काय बदल झाला आहे?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आणखी 6000 रुपये मिळतात. एकूण मिळून 12,000 रुपये दरवर्षी शेतकरी महिलांना मिळतात.

हीच पार्श्वभूमी लक्षात घेता, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अशा महिलांना, ज्या शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत, यापुढे दरमहा 1500 ऐवजी फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

का घेतला हा निर्णय?

राज्यात निवडणूक काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आणण्यात आली होती. अर्ज प्रक्रियेत सुलभता दिल्याने राज्यभरातून तब्बल 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले होते. त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले, मात्र त्यानंतर सरकारने पात्रता निकषांवर बोट ठेवून काही महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली.

सरकारच्या नियमानुसार, कोणतीही एकच वैयक्तिक लाभ योजना लाभार्थ्याला लागू होऊ शकते. मात्र, अनेक महिला एकाच वेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकरी सन्मान निधी योजना दोन्हीचा लाभ घेत होत्या. त्यामुळे अशा लाभार्थींना आता 1500 ऐवजी 500 रुपयेच दिले जाणार आहेत.

५०० रुपये मिळाल्याच्या महिलांच्या तक्रारी

जिल्ह्यातील काही महिलांनी मागच्यावेळी ५०० रुपयेच मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्यांना नेमके ५०० रुपयेच मिळाले आहेत किंवा कमी रक्कम का मिळाली, याची पडताळणी आमच्या स्तरावर होत नाही. त्यामुळे त्याचे नेमके कारण सांगता येत नाही.

– प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

आता लक्ष अडीच लाख उत्पन्नावर…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील दोन कोटी ५८ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यात अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाखो महिला असू शकतात, असा महिला व बालकल्याण विभागाला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने असलेल्यांची नावे जशी परिवहन विभागाकडून घेतली, तशीच माहिती पॅनकार्डवरुन लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती, याची माहिती आयकर विभागाकडून मागविण्यात आली आहे.

‘शेतकरी सन्मान निधी’ची स्थिती

एकूण लाभार्थी: ९३.२६ लाख
दरमहा लाभाची रक्कम: १,८६५ कोटी
अंदाजे महिला शेतकरी: १९ लाख

Free Silai Machine Yojana: आजपासून महिलांना मोफत शिलाई मशीन! अर्ज करण्याची अंतिम संधी

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !