राज्यातील दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाची Mahajyoti Tab Yojana 2025 ही योजना सुरू झाली असून, याअंतर्गत दहावी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, 6 GB इंटरनेट डेटा आणि ऑनलाइन कोचिंग दिलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया या मोफत टॅबलेट योजना बद्दल सविस्तर माहिती.
ही योजना नेमकी काय आहे?
महाज्योती योजना ही महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्गीय, भटक्या, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य डिजिटल साधने उपलब्ध करून देणे.
योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना खालील गोष्टी मिळतील:
- मोफत टॅबलेट
- दरमहा 6GB डेटा
- NEET, JEE, CET, CAT सारख्या परीक्षांसाठी ऑनलाईन कोचिंग (2025 ते 2027 पर्यंत)
पात्रता काय आहे?
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी OBC, NT, VJ, SBC या प्रवर्गातील असावा.
- 2025 मध्ये दहावी पास केलेली असावी.
- दहावी नंतर 11वीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे आणि नॉन-क्रीमिनल दाखला आवश्यक.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- नॉन-क्रीमिनल सर्टिफिकेट (2 वर्षांपेक्षा जुना नसावा)
- दहावीची मार्कशीट
- 11वी प्रवेशाचे प्रमाणपत्र
अर्ज कसा कराल?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. तुम्हाला वरील सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी तयार ठेवावी लागेल. अर्ज करण्यासाठी Mahajyotiच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
✅ 31 मे 2025 ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थी आणि पालकांनी वेळेवर अर्ज भरून ही सुवर्णसंधी गमावू नये.
महत्त्वाचे फायदे:
- महागड्या कोचिंग क्लासेसशिवाय घरबसल्या अभ्यासाची संधी
- डिजिटल साधनांची सुविधा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
निष्कर्ष:
Mahajyoti Tab Yojana 2025 ही योजना खरोखरच गरीब आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य पद्धतीने करता येणार आहे. म्हणून, जर तुम्ही पात्र असाल, तर लगेचच ऑनलाइन अर्ज करा आणि मोफत टॅबलेट योजनाचा लाभ घ्या.
Maharashtra Gharkul Yojana | लाडक्या बहिणींना मिळणार थेट 2 लाख! घरकुल योजना 2025 ची मोठी बातमी!
Good job