PMEGP Loan Yojana 2025: व्यवसायासाठी मिळणार 50 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने PMEGP Loan Yojana 2025 म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार सृजन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र नागरिकांना 20 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार असून यावर सरकारी सबसिडी देखील मिळणार आहे.

PMEGP Loan Yojana म्हणजे काय?

PMEGP (Prime Minister’s Employment Generation Programme) ही केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे, ज्यामध्ये देशातील बेरोजगार युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेचा उद्देश म्हणजे:

  • युवकांना रोजगार देणे
  • उद्योजकता वाढवणे
  • आर्थिक सशक्तिकरण घडवणे

या योजनेंतर्गत जर कोणी व्यक्ती व्यवसाय सुरू करत असेल, तर त्याच्या माध्यमातून इतर लोकांनाही रोजगार मिळण्याची संधी निर्माण होते.

PMEGP Loan Yojana 2025 ची वैशिष्ट्ये

  • कर्ज रक्कम: ₹20 लाख ते ₹50 लाख पर्यंत
  • कर्जावर सबसिडी: ग्रामीण भागात 35% व शहरी भागात 25%
  • लाभार्थी: बेरोजगार युवक/उद्योजक
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन/ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून

पात्रता – PMEGP लोन योजना 2025

PMEGP Loan Yojana Apply Online करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  1. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
  2. व्यवसायाची किंमत ₹5 लाख पेक्षा जास्त असेल, तर अर्जदार किमान 8वी उत्तीर्ण असावा.
  3. आधार उद्योग (Aadhar Udyog) नोंदणी आवश्यक.
  4. मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा.
  5. उमेदवाराचे आधीचे कोणतेही सबसिडी लाभ असलेले प्रकल्प नसावेत.
  6. व्यवसायाची नोंदणी Registration Act 1860 अंतर्गत झालेली असावी.

आवश्यक कागदपत्रे – PMEGP Loan Documents List

PMEGP Loan Yojana Online Apply करताना पुढील कागदपत्रांची स्कॅन कॉपी लागते:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
  • राहण्याचा दाखला
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट साइज फोटो
  • बँक खाते तपशील
  • मोबाइल नंबर (आधारशी लिंक असावा)

सूचना: कागदपत्रे मोबाइलने फोटो न काढता स्कॅन करून अपलोड करावीत. अन्यथा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.

PMEGP Loan Yojana चे फायदे

  • व्यवसाय सुरू करण्यासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज.
  • ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी 35% सबसिडी, शहरी भागात 25% सबसिडी.
  • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना.
  • व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत.
  • बेरोजगार युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी.

PMEGP Loan Yojana Online Apply – कसे करावे?

तुम्ही या योजनेसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता:

Step 1:

👉 http://www.kviconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Step 2:

Online Apply’ पर्यायावर क्लिक करा आणि PMEGP Application Form ओपन करा.

Step 3:

फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक व व्यवसायाची माहिती भरून कागदपत्र अपलोड करा.

Step 4:

सर्व माहिती पुन्हा तपासा व फॉर्म सबमिट करा.

Step 5:

तुमचा अर्ज विभागाकडून मंजूर झाल्यानंतर, तुमच्या बँक खात्यात कर्ज रक्कम ट्रान्सफर केली जाईल.

PMEGP Loan Yojana FAQ

प्र. PMEGP लोन योजना अंतर्गत किती कर्ज मिळते?

उत्तर: 20 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत, यावर सबसिडी देखील मिळते.

प्र. ही योजना कोणासाठी आहे?

उत्तर: जे युवक स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात व पात्रता अटी पूर्ण करतात.

ICICI Bank Mudra Loan Yojana: ICICI बँकेकडून 1000 ते 10 लाख पर्यंत मुद्रा लोन घ्या! सरकार बदलण्यापूर्वी संधीचा फायदा उचला!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !