Tokan Yantra Anudan 2025: मान्सूनचा हंगाम सुरू झालेला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने “टोकन यंत्र अनुदान योजना 2025” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टोकण यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य (अनुदान) दिलं जात आहे आणि त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
जर तुम्ही देखील टोकन यंत्रासाठी अर्ज करू इच्छित असाल, तर खाली दिलेली स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस नक्की वाचा आणि आजच अर्ज करा!
टोकन यंत्र म्हणजे काय?
टोकन यंत्र हे एक मनुष्य चालित कृषी अवजार आहे, जे बियाणे पेरणीसाठी वापरलं जातं. हे यंत्र शेतकऱ्यांचं काम सोपं करतं आणि वेळेची बचत करते. यामुळे योग्य प्रमाणात बियाण्यांचं वितरण होतं, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
टोकन यंत्र अनुदान योजनेच्या पात्रतेचे निकष
- अर्जदार शेतकरी असावा
- आधार क्रमांक आणि महाडीबीटीवर नोंदणी असलेली हवी
- फार्मर आयडी आवश्यक आहे
- ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी अर्ज केला नसेल, त्यांनी पेमेंट ₹23.60 भरावं लागेल
महाडीबीटी पोर्टलवर टोकन यंत्रसाठी अर्ज कसा करावा?
1. mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
2. “Farmer Login / शेतकरी लॉगिन” या पर्यायावर क्लिक करा
3. Farmer ID टाकून लॉगिन करा
- Farmer ID माहीत नसल्यास, “Farmer ID जाणून घ्या” वर क्लिक करा
- आधार क्रमांक टाकून Farmer ID मिळवा
4. लॉगिन केल्यावर “प्रोफाइल पूर्ण करा” वर जा
- विचारलेली सर्व माहिती भरून 100% प्रोफाइल पूर्ण करा
5. “घटकासाठी अर्ज करा” या विभागात जा
- “कृषी यांत्रिकीकरण” हा पर्याय निवडा
- “कृषी यंत्र व अवजारासाठीचे अर्टल सहाय्य” या पर्यायावर क्लिक करा
- “मनुष्य चलित अवजारे” निवडा
- यामध्ये “टोकन यंत्र” निवडा
6. पूर्वसंमती:
- “मी पूर्वसंमतीशिवाय अवजारे विकत घेणार नाही” यावर ✅ क्लिक करा
- “बाब जतन करा” वर क्लिक करा
- नंतर “अर्ज जमा करा” वर क्लिक करा
7. पेमेंट प्रक्रिया:
- जर पूर्वी अर्ज केला असेल तर पेमेंट लागणार नाही
- पहिल्यांदा अर्ज करणाऱ्यांसाठी ₹23.60 चे पेमेंट आवश्यक आहे
अर्जासाठी वेळेचं महत्व
या योजनेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना “पहिले अर्ज – पहिले प्राधान्य” या तत्वावर लाभ दिला जातो. त्यामुळे जर तुम्ही वेळेवर अर्ज केला, तर तुम्हाला टोकन यंत्रावर अनुदान मिळण्याची शक्यता अधिक आहे.
निष्कर्ष
टोकन यंत्र अनुदान योजना 2025 ही शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त योजना आहे, जी त्यांना आधुनिक शेती साधनं मिळवण्यासाठी मदत करते. महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज प्रक्रिया सोपी आणि ऑनलाइन असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला सहजपणे अर्ज करता येतो.