Wednesday, August 27, 2025
Homeमहाराष्ट्र योजनाShidivinayak Trust Yojana | राज्यातील मुलींना मिळणार 10,000 रुपयांची थेट मदत –...

Shidivinayak Trust Yojana | राज्यातील मुलींना मिळणार 10,000 रुपयांची थेट मदत – सिद्धिविनायक ट्रस्टची नवी योजना!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

राज्यातील मुलींसाठी एक खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे. Shidivinayak Trust Yojana म्हणजेच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना लवकरच राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या नावावर 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट त्यांच्या आईच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळवून देणे हा आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट ही योजना राबवणार असून, यासाठी न्यास व्यवस्थापन समितीची मंजुरी मिळाली आहे. शासनाकडे अंतिम प्रस्तावही पाठवण्यात आला असून, लवकरच याचे निकष जाहीर करण्यात येतील.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून समाजात मुलींच्या जन्माकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा यात उद्देश आहे.

सध्या माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसारख्या योजनांतून मुलींना आर्थिक मदत दिली जाते. त्याच धर्तीवर ही Shidivinayak Trust Yojana सुरू करण्यात येणार आहे, जी या योजनांना पूरक ठरेल.

या योजनेसह, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट इतरही अनेक उपक्रम राबवत आहे. उदाहरणार्थ, गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजना, वैद्यकीय सहाय्य योजना, आणि डायलेसिस सेंटरद्वारे उपचार सेवा यासारख्या उपक्रमांतून ट्रस्ट समाजसेवा करत आहे.

तुमच्या घरात मुलगी नुकतीच जन्माला आली असेल आणि ती सरकारी रुग्णालयात जन्मलेली असेल, तर ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट मिळवण्यासाठी लागणाऱ्या अटी, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया शासनाकडून जाहीर झाल्यानंतर लगेच अर्ज करा.

PM MATRUTAV YOJANA: महिलांना मिळणार थेट ₹6000, तुमचं नाव आहे का यादीत?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !