Salokha Yojana Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सलोखा योजनेअंतर्गत दस्त तयार करताना नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या कामावरील खर्च कमी होणार आहे. आधी दस्त तयार करणे आणि मुद्रांक भरताना मोठा खर्च होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नव्हता. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना सुरू केली आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा तसेच वहिवाटीचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत मिळेल. शेतकऱ्यांमधील वाद मिटवून समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. सरकारी कामांवर येणाऱ्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त असतात. या खर्चातून सुटका मिळावी, यासाठी सरकारने ही योजना लागू केली आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित कामांसाठी जवळच्या तलाठी कार्यालयात जावे लागते. तेथे आवश्यक माहिती द्यावी लागते. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सलोखा योजना शासन निर्णय 2024
सलोखा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी तसेच वहिवाटीचे वाद मिटवण्यासाठी मदत मिळते. या योजनेमुळे समाजातील लोकांनी एकमेकांविषयी कुठलाही राग न ठेवता सलोख्याने राहावे, हा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन हस्तांतर करताना होणाऱ्या दस्ताच्या खर्चासाठी आणि मुद्रांक शुल्कासाठी फक्त 1000 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सवलत दिली जाणार आहे.
सलोखा योजना महाराष्ट्र 2024 फायदे
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीसाठी आवश्यक वहीवाट करण्याची सोय होईल.
- जमिन विक्री करताना होणारा अतिरिक्त खर्च कमी होईल.
- मुद्रांक शुल्कात सवलत मिळेल.
- शेतीचा ताबा घेण्यासाठी होणारा खर्च कमी होईल.
- शेतजमिनींमुळे होणारे वाद मिटून शेतकऱ्यांमधील वाद कमी होतील.
सलोखा योजना GR: या योजनेच्या अटी व शर्ती
कालावधी अदलाबदल दस्तासाठी सवलत:
सलोखा योजनेअंतर्गत अदलाबदल दस्तासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे.
पंचनामा आवश्यक:
- एकाच गावातील जमीन धारक शेतकऱ्यांच्या मालकीत असलेल्या जमिनींबाबत वस्तुस्थिती दाखवणारा पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी करून घ्यावा.
- हा पंचनामा नोंदवहीत नोंदवून त्यावर जावक क्रमांकासह प्रमाणपत्र तलाठ्याकडून शेतकऱ्यांना द्यावे.
- अदलाबदल दस्त नोंदणी करताना हा पंचनामा दस्तासोबत जोडणे बंधनकारक आहे.
किमान 12 वर्षांचा ताबा आवश्यक:
- पहिल्या शेतकऱ्याचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षे असणे आवश्यक आहे.
- अन्य कोणत्याही प्रकारच्या जमिनीच्या अदलाबदलीचा या योजनेत समावेश होणार नाही आणि त्या मुद्रांक शुल्क सवलतीस पात्र ठरणार नाहीत.
क्षेत्रफळाचा फरक स्वीकार्य:
दोन्ही शेतकऱ्यांच्या जमिनींच्या क्षेत्रफळात फरक असला तरी त्या या योजनेअंतर्गत पात्र ठरतील.
तुकड्याची नोंद आवश्यक:
अदलाबदल होणाऱ्या जमिनींची गटबुकात तुकडा म्हणून आधीच नोंद असेल, तर त्या नोंदींच्या आधारे फेरफार आणि नावे दाखल करता येतील.
मर्यादा:
ही योजना शेतीसाठी असलेल्या जमिनींवरच लागू आहे. घर, रहिवासी किंवा व्यावसायिक वापराच्या जमिनींसाठी ही योजना लागू होणार नाही.
आधीचे दस्त लागू नाहीत:
योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी अदलाबदलीसाठी केलेले दस्त किंवा भरलेले मुद्रांक शुल्क परत दिले जाणार नाही.
Salokha Yojana Maharashtra मूळ उद्देश्य
महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या वादांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. शेतजमिनीवर मालकी हक्क, शेतबांधावरचे वाद, रस्त्यांशी संबंधित तक्रारी, मोजणीवरून होणारे वाद, अतिक्रमणाचे वाद तसेच भावांमध्ये शेतजमिनीच्या वाटण्यावरून होणारे वाद अशा समस्या नेहमी पाहायला मिळतात.
हे वाद सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया किंवा पोलीस मदतीचा आधार घ्यावा लागतो. या सगळ्या प्रकरणांमुळे वेळ, पैसा आणि नातेसंबंधांवर ताण येतो. अशा वादांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीची जमीन स्वतःच्या नावावर करणे कठीण होत असे.
या समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांमधील सलोखा टिकवण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजना सुरू केली आहे. या योजनेत दस्तासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क नाममात्र 1000/- रुपये ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या वादांचे सोपे आणि कमी खर्चात समाधान मिळू शकेल.
सलोखा योजना महाराष्ट्र 2024 योजनेचा लाभ कसा घ्यावा
सलोखा योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी दस्त तयार करताना तलाठी कार्यालयात जावे लागते. योजनेसाठी आवश्यक पात्रता पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व योजनांची माहिती आम्ही या वेबसाईटवर उपलब्ध करून देत असतो. या वेबसाईटवर तुम्हाला शासन निर्णय, योजनांचे अनुदान, दुष्काळी अनुदान, आणि पिक विमा अनुदान यासंबंधित सर्व माहिती मिळेल.