Ration Card Free Sadi Yojana: राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता रेशन कार्ड असलेल्या महिलांना सरकारतर्फे मोफत साडी दिली जाणार आहे. होळी सणानिमित्त राज्य सरकारने ‘अंत्योदय’ गटातील लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत मार्चपासून साड्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
राज्यात याआधीही महिलांसाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘लेक लाडकी’, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ अशा योजना राबवल्या गेल्या आहेत. याच परंपरेत आता रेशन कार्डवरील लाभार्थी महिलांसाठी साडी वाटप करण्यात येत आहे.
साडी वाटपाची प्रक्रिया जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये सुरू झाली असली, तरी काही ठिकाणी अजूनही साड्या मिळालेल्या नाहीत. अकोला जिल्ह्याचा विचार केला, तर एकूण ४५,६६४ पात्र महिलांपैकी फक्त २५,४०० महिलांना साड्या मिळाल्या आहेत. उर्वरित २०,२६४ महिलांना अजूनही वाटपाची वाट पाहावी लागतेय.
साड्या आधीच सरकारी गोदामात पोहोचल्या असून मार्च महिन्यापासून वाटप सुरू आहे. मात्र होळी संपूनही साड्यांचे वाटप संथगतीने सुरू आहे. ही साड्या स्वस्त धान्य दुकानांमधून दिल्या जात आहेत.
अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. साडी वाटपासाठी साड्या फेब्रुवारी अखेरीसच गोदामात दाखल झाल्या होत्या. शासनाने २६ जानेवारी ते होळी दरम्यान साड्या वाटण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण काही कारणास्तव वाटप प्रक्रिया उशिरा सुरू झाली.
Ration Card Free Sadi Yojana
अकोला जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये साड्यांचे वाटप टक्केवारीनुसार पुढीलप्रमाणे झाले आहे:
- अकोला शहर: ४४.९१%
- अकोला ग्रामीण: ८०%
- अकोट: ३८%
- बाळापूर: ९३.६३%
- बार्शीटाकळी: ६५.३६%
- मूर्तिजापूर: २६.०८%
- पातूर: ७४.५४%
- तेल्हारा: ४४.०३%
सध्या जिल्ह्यातील एकूण वाटप ५५.६२ टक्क्यांवर आहे.
सरकारने ही योजना राबवून महिलांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र वाटप लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्व पात्र महिलांना वेळेत लाभ मिळू शकेल.