PM Kisan 20th Installment Check | PM किसान योजनेची 20वा हफ्ता यादी LIVE | घरबसल्या 1 मिनिटात नाव तपासा!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

PM Kisan 20th Installment Check: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत या योजनेतून दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या शेतकरी 20व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.

PM किसान योजना 20वा हप्ता कधी येणार?

सध्या सरकारकडून 20व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठवड्यात म्हणजेच 30 जून 2025 पर्यंत 20व्या हप्त्याचे वितरण करू शकतात. तरीही, अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइटवर नजर ठेवावी.

20वा हप्ता उशीराने का येत आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्या व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे हप्त्याच्या घोषणेमध्ये थोडा उशीर होत आहे. जसेच त्यांना वेळ मिळेल, ते त्वरित 20व्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात करतील, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा संयम बाळगावा.

कोणत्या शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही?

सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळेलच असे नाही. ज्यांनी अजूनही ‘ई-केवायसी’ पूर्ण केलेली नाही, त्यांचा हप्ता अडकू शकतो. कारण ई-केवायसी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. ई-केवायसीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

  • ऑनलाइन ई-केवायसी: PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्ही स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
  • बँकेत जाऊन ई-केवायसी: जवळच्या CSC सेंटर किंवा बँकेत जाऊन आधार कार्डसह ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

याशिवाय काही महत्त्वाचे अटी:

  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत असणे गरजेचे आहे.

जर वरील अटी पूर्ण नसतील, तर तुमची 20वी हप्ता अडकू शकते.

PM किसान योजना लाभार्थी यादीत आपले नाव कसे तपासावे?

जर तुम्हाला खात्री करायची असेल की तुमचं नाव यादीत आहे की नाही, तर खालील सोपी पद्धत वापरा:

लाभार्थी यादी (Beneficiary List) तपासण्यासाठी:

  1. PM किसान योजना अधिकृत वेबसाइट वर जा.
  2. होमपेजवर “Farmer Corner” या विभागावर क्लिक करा.
  3. त्यानंतर “Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा.
  4. आता आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  5. यादीमध्ये आपले नाव दिसत असल्यास, आपण लाभार्थी आहात.

20वी हप्त्याची स्थिती (Status) कशी तपासाल?

तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. Farmer Corner” मध्ये “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.
  3. येथे आपला आधार क्रमांक / नोंदणीकृत मोबाइल नंबर / बँक अकाऊंट नंबर टाका.
  4. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा हप्ता मिळाला आहे का, तो कधी जमा झाला, पुढचा हप्ता कधी येईल याची माहिती दिसेल.

निष्कर्ष:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. 20वी हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे. सरकारकडून तारीख जाहीर होताच ती वेबसाईटवर प्रदर्शित होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी ई-केवायसी व बँक डिटेल्स अपडेट ठेवून तयार राहावे.

PM Kisan च्या 20 व्या हप्त्याची बड़ी बातमी! ₹2000 कधी मिळणार? जाणून घ्या तारीख

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !