Wednesday, August 27, 2025
HomePM योजनाPM Internship Yojana 2025: १०वी पास झालात? मग ही सुवर्णसंधी गमावू नका...

PM Internship Yojana 2025: १०वी पास झालात? मग ही सुवर्णसंधी गमावू नका – दरमहा मिळणार ५ हजार!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

PM Internship Yojana 2025: आज आपण पंतप्रधान इंटरशिप योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही योजना विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे कारण या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरमहा 5000 रुपये मिळणार आहेत. शिक्षण चालू ठेवताना आर्थिक मदतीसाठी ही एक उत्तम संधी आहे. चला तर मग, यामध्ये अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, कोणते कागदपत्र लागतात, हे सविस्तर समजून घेऊया.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना देशातील नामांकित 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली आहे. या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो आणि भविष्यातील करिअरसाठी त्यांना मार्गदर्शन मिळते. सरकारने 5 वर्षांत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या योजनेचे फायदे:

  • प्रत्येक महिन्याला 5000 रुपये स्टायपेंड मिळणार
  • इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देखील मिळणार
  • मंत्रालये, सरकारी विभाग आणि खासगी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव
  • भविष्यात नोकरीसाठी चांगले पर्याय निर्माण होतील

पात्रता:

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा
  • वय 21 ते 24 वर्षांदरम्यान असावे
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे
  • अर्जदार व त्याचे पालक/जोड़ीदार सरकारी नोकरीत नसावेत
  • खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक:
    • 10वी किंवा 12वी पास
    • ITI/पॉलिटेक्निक डिप्लोमा
    • पदवी (BA/BCom/BSc/BBA/BCA/B.Pharma)

कोण पात्र नाही:

  • IIT, IIM, NLU, IISER, NID, IIIT मधील पदवीधर
  • CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA धारक
  • आधीच इंटर्नशिप करणारे विद्यार्थी

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइट https://pminterhttps://pminternship.mca.gov.in/login/nship.mca.gov.in/login/ ला भेट द्या.
  2. “Register Now” किंवा “Youth Registration” वर क्लिक करा
  3. मोबाईल नंबर आणि माहिती भरून पासवर्ड सेट करा
  4. प्रोफाइलमध्ये शैक्षणिक व बँक तपशील भरा
  5. e-KYC प्रक्रिया पूर्ण करा (आधार/डिजिलॉकर वापरून)
  6. डॅशबोर्डवर जाऊन “Internship Opportunities” वर क्लिक करा
  7. इच्छित इंटर्नशिप निवडून “Apply” करा
  8. स्वघोषणपत्र वाचा आणि सबमिट करा

निवड प्रक्रिया: ऑनलाइन अर्ज आल्यानंतर उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग होईल. नंतर कंपन्यांकडे ही यादी पाठवली जाईल आणि कंपन्या स्वतःची निवड प्रक्रिया पार पाडतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. शिक्षणासोबतच कामाचा अनुभव घेऊन भविष्याची दिशा ठरवण्याची हीच योग्य वेळ आहे.

Annapurna Yojana 2025: महिलांना मिळणार ३ गॅस सिलेंडर मोफत, सरकारचा धक्कादायक निर्णय!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !