Majhi Ladki Bahin Yojana Loan: महाराष्ट्र सरकारने महिला सशक्तीकरणासाठी सुरू केलेली ‘माझी लाडकी बहिन योजना’ आता आणखी उपयुक्त ठरणार आहे. योजनेत दरमहा 1500 रुपये मिळणाऱ्या महिलांना आता ४०,००० रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देखील दिले जाणार आहे.
हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आला आहे. लाडकी बहिन योजना लोन अंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आधीच सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्य (Majhi Ladki Bahin Yojana Loan Highlights)
योजना | माझी लाडकी बहिन योजना लोन |
सुरु करणारे | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्यातील महिला |
दरमहा मिळणारी रक्कम | ₹1500 (अनुदान) |
लोन रक्कम | ₹40,000 पर्यंत |
कर्जाचा व्याज दर | जवळपास शून्य |
अर्ज पद्धत | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | [mahaladkibahin.gov.in]* |
वापर | नवीन व्यवसाय/उद्योग सुरू करणे |
या योजनेचा उद्देश काय आहे?
माझी लाडकी बहिन योजना लोन हे पाऊल महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उचलण्यात आले आहे. या योजनेतून महिलांना:
- रोजगाराचे नवीन संधी निर्माण करता येतील
- छोटा उद्योग सुरू करता येईल
- सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करता येईल
- आणि ते सुद्धा बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात!
पात्रता काय आहे? (Ladki Bahin Loan Eligibility)
- अर्जदार महिला महाराष्ट्रची रहिवासी असावी
- सरकारी नोकरीत कोणीही नसलेले कुटुंब
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी
- कुटुंब आयकर दाता नसावा
- ट्रॅक्टर वगळता दुसरे चारचाकी वाहन नसावे
- सिबिल स्कोर चांगला असावा
- बँक खाते आधारशी लिंक असावे आणि DBT अॅक्टिव असावा
- महिला सध्या लाडकी बहिन योजनेचा लाभ घेत असावी
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- शेवटचे ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मोबाईल नंबर
लाडकी बहिन योजना लोनसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
सध्या योजना घोषित करण्यात आली आहे, पण लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्यासाठी:
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा
- नवीन असाल तर Create New Account करा
- तुमची माहिती भरून लॉगिन करा
- मेनूतील Loan सेक्शन निवडा
- माहिती भरा, कागदपत्रं अपलोड करा
- Submit करा आणि पावती डाऊनलोड करा
बिनव्याजी ४०,००० रुपये कर्ज – हप्ते कसे फेडले जातील?
महिलेला मिळणाऱ्या दरमहा 1500 रुपयांमधूनच EMI कापली जाईल.
जेव्हा संपूर्ण कर्ज परतफेड होईल, तेव्हा पुन्हा दरमहा 1500 रुपये नियमित स्वरूपात मिळतील.
लोन स्टेटस कसा तपासायचा?
- वेबसाईटवर लॉगिन करा
- “Application Made Earlier” वर क्लिक करा
- तुमची माहिती भरा
- लोन अर्जाची स्थिती बघा
महत्त्वाचे अपडेट: ५०,००० पर्यंत कर्ज मिळणार?
अजित पवार यांनी सांगितले की, काही प्रकरणांमध्ये महिला उद्योजिकांना ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज देखील कमी व्याजदरावर असेल.
निष्कर्ष
Majhi Ladki Bahin Yojana Loan 2025 ही एक सुवर्णसंधी आहे ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे. फॉर्म सुरू होताच त्वरित अर्ज करा आणि महिला सशक्तीकरणाचा भाग व्हा.
Update Ladki Bahin Yojana June: लाडक्या बहिणींना थेट ४०,००० रुपये! सरकारचा धडाकेबाज निर्णय जाहीर!