Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्र योजनाMahavistar App 2025 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता AI देणार कृषी सल्ला...

Mahavistar App 2025 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता AI देणार कृषी सल्ला – महाविस्तार अ‍ॅप लाँच

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Mahavistar App 2025: यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पिकं निवडावी, आणि बियाणं वेळेवर मिळतील यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांनी ‘साथी’ पोर्टलचा वापर करावा. हे पोर्टल केंद्र सरकारने सुरू केलं असून, यातून शेतकऱ्यांना चांगली, प्रमाणित बियाणं, कृषी साधनं आणि बाजारभाव याची माहिती मिळते. यामुळे बोगस बियाणांपासून बचाव होतो.

याच कार्यक्रमात फडणवीस यांनी महाविस्तार – AI अ‍ॅप लाँच केलं. हे अ‍ॅप शेतकऱ्यांना रिअल टाइम (तात्काळ) कृषी सल्ला देणार आहे. म्हणजेच, पिकं कशी निवडावी, बियाणं कुठली वापरावी, हवामानाचा अंदाज, खत किती व कसं द्यावं, सिंचन कसं करावं – या सर्व गोष्टींचा सल्ला अ‍ॅपमधून मिळणार आहे.

महाविस्तार अ‍ॅपचे फायदे:

  • हे अ‍ॅप AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून काम करतं.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार शास्त्रशुद्ध माहिती मिळते.
  • लवकरच हे अ‍ॅप WhatsApp वरही वापरता येईल.

सरकारची तयारी:

शासनाने खरीप हंगामासाठी आधीच तयारी केली आहे. शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे की, कोणती पिकं घ्यायची, बियाणं कुठे मिळतील, सिंचनासाठी काय उपाय करायचे आणि उत्पादन कसं वाढवायचं.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची मदत घेऊन सशक्त बनवायचं आहे, आणि राज्य सरकार त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

Ladki Bahin Yojana 11th Installment Live Update: लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांना आज मिळणार पैसे!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !