Lek Ladki Yojana Form PDF Download: नमस्कार वाचकांनो, महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केलेली लेक लाडकी योजना 2025 मध्येही सुरू आहे आणि राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीं साठी ही योजना खूपच फायदेशीर ठरत आहे. जर तुमचं अपत्य मुलगी असेल आणि ती 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली असेल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे.
या लेखामध्ये आपण लेक लाडकी योजना फॉर्म PDF कसा डाऊनलोड करावा, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
लेक लाडकी योजना फॉर्म PDF डाउनलोड 2025
जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला लेक लाडकी योजना PDF फॉर्म डाऊनलोड करून भरावा लागेल. हा फॉर्म तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडून घेऊ शकता किंवा खाली दिलेल्या लिंकवरून थेट PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता.
लेक लाडकी योजना फॉर्म PDF डाउनलोड करा – येथे क्लिक करा
लेक लाडकी योजना 2025 चा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देणे आणि त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी मदत करणे. तसेच, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणात गळती टाळणे आणि स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे हाही महत्त्वाचा उद्देश आहे.
अनुदान कसे मिळेल? (5 टप्प्यांमध्ये)
सरकारकडून 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान थेट मुलीच्या नावावरच्या खात्यात जमा होणार आहे.
टप्पा | अनुदान रक्कम |
जन्मावेळी | ₹5,000 |
1लीत प्रवेश | ₹6,000 |
6वीत प्रवेश | ₹7,000 |
11वीत प्रवेश | ₹8,000 |
18 वर्षे पूर्ण | ₹75,000 |
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
- वर दिलेला PDF फॉर्म डाऊनलोड करा.
- तो फॉर्म नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून घ्या.
- फॉर्म आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे जमा करा.
- अंगणवाडी सेविका तो फॉर्म वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवतील.
- खात्री केल्यानंतर मुलीच्या नावावर योजना खातं उघडले जाईल आणि टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल.
लेक लाडकी योजना 2025 पात्रता (Eligibility)
- अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा.
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी आहे.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
- मुलीचा जन्माचा दाखला किंवा आधार कार्ड
- पालकांचे आधार कार्ड
- पिवळे/केशरी रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक (मुलीच्या नावाने)
- पालक आणि मुलीचा फोटो
- मोबाईल नंबर, ईमेल आयडी