Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहिना 1500 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत.
राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने, निवडणूक आयोगाने योजनेवर तात्पुरती स्थगिती दिली आहे. तरीही, लाडकी बहीण योजने अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. चला, तर मग लाडकी बहीण योजनेबद्दलचे नवीन अपडेट्स जाणून घेऊया.
लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अपडेट
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या घोषणा करत आहेत. त्याच प्रमाणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजने साठी एक मोठी घोषणा केली आहे.
लाडकी बहीणांना आता मिळणार 2100 रुपये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यावर दरमहिना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मानधन दिले जाईल. या घोषणेमुळे महिलांना आर्थिक मदतीचा मोठा फायदा होईल.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिलां आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील विविध महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये हप्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन आशीर्वाद दौऱ्यात घोषणा केली की, सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजने अंतर्गत सध्या 1500 रुपये असलेल्या मानधनाची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाईल. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच पात्र महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 10 मोठ्या घोषणा
- राज्यातील लाडकी बहिणींना प्रतिमाही 2100 रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये.
- प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
- वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
- जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
- राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
- 45 हजार पांदण रस्ते बांधणार.
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
- वीज बिलात 30 टक्के कपात.
- शंभर दिवसात ‘व्हिजन महाराष्ट्र 2029’ सादर करणार.
अधिक वाचा: Vidya Vetan Yojana: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा ₹10,000 पर्यंत!