Ladaki Bahin Money Scheme: तुम्ही लाडकी बहिण आहात का? मिळवा थेट 1 लाखाचं कर्ज – आजच अर्ज करा!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladaki Bahin Money Scheme) महिलांना आता १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने दिले जाणार आहे, म्हणजेच तुम्हाला कर्जावर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.

ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी राबवली जात आहे, जेणेकरून त्या लघुउद्योग सुरू करून आपला व्यवसाय उभा करू शकतील.

लाडकी बहीण योजना कर्जाचे फायदे:

  • १ लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा
  • शून्य टक्के व्याज – कर्जावर कोणतेही व्याज नाही
  • मुंबई बँकेमार्फत कर्जपुरवठा
  • ५ ते १० महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन
  • राज्यातील १२-१३ लाख महिलांना याचा लाभ मिळणार

योजना कशी राबवली जाणार?

या योजनेत मुंबई बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप केले जाणार आहे. यासाठी महिला बचतगट किंवा ५-१० महिलांचे गट तयार करून लघुउद्योग सुरू करण्याची संधी दिली जाते.

कर्जासाठी अर्ज केल्यानंतर, संबंधित महिलांचा व्यवसाय, योजना व उद्दिष्ट यांची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होईल.

व्याज कोण देणार?

या योजनेत महिला लाभार्थींना व्याज भरावे लागणार नाही. कारण राज्यातील चार महामंडळं मिळून व्याजाची परतफेड करतील:

  1. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ
  2. पर्यटन महामंडळाची ‘आई योजना’
  3. भटक्या-विमुक्त महामंडळ
  4. ओबीसी महामंडळ

या सर्व महामंडळांनी मिळून निर्णय घेतला आहे की महिलांना कर्जाच्या व्याजाची भरपाई राज्य शासन करणार आहे.

कर्ज कोण देणार?

ही सुविधा मुंबई बँक देत आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी सांगितले की, सध्या १ लाखांहून अधिक महिला बँकेच्या सभासद आहेत, आणि लाडकी बहीण योजनेतही १२ ते १३ लाख महिला सहभागी आहेत.

सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी टप्प्याटप्प्याने राज्यभर योजना राबवली जाणार आहे.

अर्ज कसा करावा? (Ladaki bahin karyakram kargacha arj)

  • अर्जदार महिला ही माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणीकृत असावी.
  • ५ ते १० महिलांचा समूह तयार करून लघुउद्योगाची योजना तयार करा.
  • मुंबई बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं जमा करा (यादी खाली दिली आहे).
  • कर्जाची तपासणी पूर्ण झाल्यावर १ लाख रुपये थेट खात्यात जमा होतील.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • पत्त्याचा पुरावा (Address Proof)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • लघुउद्योगाची माहिती (Project Report)
  • बचतगट नोंदणी प्रमाणपत्र (Group Certificate)
  • बँक पासबुक (Bank Passbook)

लाडकी बहीण योजना १ लाख कर्ज ही योजना म्हणजे राज्यातील महिलांसाठी स्वावलंबनाकडे एक मोठं पाऊल आहे. महिला बचतगटांनी आता पुढाकार घेऊन लघुउद्योग सुरू करण्यासाठी या संधीचा फायदा घ्यावा.

Ladaki Form Online 2025: फक्त 5 मिनिटांत करा लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज – पहा स्टेप बाय स्टेप गाईड!


Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !