EV Vehicle Scheme: राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास तुम्हाला मिळणार आहे थेट 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत. केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जात आहे. आज आपण जाणून घेणार आहोत EV Vehicle Rate, ही नवीन योजना कोणासाठी आहे, कोणती वाहनं घेता येतील आणि टोलमाफीसह आणखी कोणते फायदे मिळणार आहेत.
इलेक्ट्रिक वाहन योजना म्हणजे काय?
Electric Vehicle Subsidy Maharashtra योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना सरकारकडून थेट सवलत दिली जाते. ही रक्कम थेट वाहन उत्पादक कंपन्यांना दिली जाते आणि त्याचा फायदा ग्राहकांना वाहन खरेदी करतानाच मिळतो.
कोणती सबसिडी मिळेल?
- दुचाकी इलेक्ट्रिक वाहन: ₹10,000 पर्यंत प्रोत्साहन रक्कम
- चारचाकी वाहन (टॅक्सी, कार): ₹2 लाख पर्यंत सवलत
- खासगी व सार्वजनिक बस: ₹20 लाखांपर्यंत प्रोत्साहन
EV वाहन खरेदीवर टोलमाफी सुद्धा!
महाराष्ट्र सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय म्हणजे काही महत्त्वाच्या महामार्गांवर EV वाहनांसाठी पूर्ण टोल माफी देण्यात आली आहे. यामध्ये खालील मार्गांचा समावेश आहे:
- समृद्धी महामार्ग
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे
- शिवडी-न्हावा शेवा ‘अटल सेतू’
ही सुविधा सध्या निवडक मार्गांवर लागू असून, लवकरच इतर मार्गांवरही लागू होण्याची शक्यता आहे.
या योजनेमागचा उद्देश
राज्यात प्रदूषण कमी करणे, इंधन खर्च वाचवणे, आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. EV vehicle rate कमी करणे आणि वाहन खरेदी सुलभ करणे हाच सरकारचा मुख्य हेतू आहे.
EV vehicle कुठून घ्यावे?
तुम्ही जवळच्या अधिकृत इलेक्ट्रिक वाहन डीलरशिप किंवा शासकीय मान्यताप्राप्त शोरूममधून EV खरेदी करू शकता. खरेदी करताना तुम्हाला थेट सबसिडीचा लाभ मिळेल. जर तुम्ही नवीन वाहन खरेदीचा विचार करत असाल, तर ही संधी नक्कीच गमावू नका. EV vehicle rate आता खूपच स्वस्त झाला आहे आणि त्यावर मिळणाऱ्या सबसिडीमुळे तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. त्याचबरोबर तुमचे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी पुढे जाईल.