Bandhkam Kamgar Scheme 2025: बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार थेट ₹20,000 शिक्षणासाठी – आजच अर्ज करा!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Bandhkam Kamgar Scheme 2025: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे! आता बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी १५,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही योजना “बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना 2025 (Bandhkam Kamgar Scheme)” म्हणून ओळखली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे बांधकाम मजुरांच्या कुटुंबावर असलेला शैक्षणिक खर्चाचा ताण कमी करणे आणि त्यांच्या मुलांना उज्वल भवितव्य घडवण्याची संधी देणे.

या योजनेतून काय लाभ मिळणार आहे?

बांधकाम क्षेत्रातील मजुरांची आर्थिक स्थिती बऱ्याचदा कमकुवत असते, त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात. यासाठी सरकारने पुढाकार घेत प्राथमिक पासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

शैक्षणिक स्तरानुसार शिष्यवृत्ती रक्कम पुढीलप्रमाणे:

  • इयत्ता 1 वी ते 7 वी – ₹2,500
  • इयत्ता 8 वी ते 10 वी – ₹5,000
  • इयत्ता 11 वी ते 12 वी – ₹10,000
  • पदवी शिक्षणासाठी – ₹20,000
  • पदव्युत्तर शिक्षणासाठी – ₹25,000
  • अभियांत्रिकी शिक्षणासाठी – ₹60,000
  • वैद्यकीय शिक्षणासाठी – ₹1,00,000

ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

योजनेची पात्रता काय आहे? (Bandhkam Kamgar Scheme Eligibility)

  1. लाभार्थीचा पालक किंवा पालक दोघेही महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
  2. विद्यार्थी आणि पालक हे दोघंही महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असावेत.
  3. विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान ५०% गुण मिळवलेले असावेत.
  4. विशेष बाब: कामगाराची पत्नी शिक्षण घेत असल्यास तिलाही या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.

अर्ज कसा करायचा? (Bamdkam Kamgar Scheme Arj Process)

ही शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून अर्ज करता येते.

✅ ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.mahabocw.in
  2. “शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme)” या विभागावर क्लिक करा
  3. Apply Online” वर क्लिक करा
  4. फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा आणि स्कॅन केलेली कागदपत्रं अपलोड करा
  5. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा

✅ ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:

  • जवळच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळ कार्यालयात जाऊन अर्ज फॉर्म मिळवा
  • वेबसाईटवरून देखील फॉर्म डाऊनलोड करता येतो
  • फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात सबमिट करा

लागणारी कागदपत्रे (Bandkam Kamgar Yojana Document List)

  1. कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  2. विद्यार्थ्याचे व पालकांचे आधार कार्ड
  3. रेशन कार्ड (कुटुंबाचा पुरावा)
  4. बँक पासबुक (आधारशी लिंक असलेले)
  5. रहिवासी प्रमाणपत्र
  6. शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  7. मागील परीक्षेची गुणपत्रिका
  8. पासपोर्ट साइज फोटो
  9. सक्रिय मोबाइल नंबर

Bandhkam Kamgar Scheme ही योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या दारात खुलं आकाश आहे. आर्थिक कारणांमुळे शिक्षण थांबू नये म्हणूनच ही शिष्यवृत्ती त्यांच्या हक्काची आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर ही संधी नक्कीच गमावू नका.

आता अर्ज करा आणि आपल्या मुलांना त्यांच्या स्वप्नांची दिशा द्या! “बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना 2025” चा लाभ घेण्यासाठी आजच पुढाकार घ्या!

Bandhakam Kamgar Laptop Yojana: फक्त हे कागदपत्र द्या आणि मिळवा मोफत लॅपटॉप – बांधकाम कामगारांसाठी सुवर्णसंधी!


Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !