---Advertisement---

Crop Insurance News: मोठी बातमी! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात – तुमचं नाव आहे का यादीत?

|
Facebook
Crop Insurance News
---Advertisement---
WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Crop Insurance news नुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी वाट पाहत होते की, पीक विम्याचे पैसे कधी मिळणार. अखेर ही प्रतिक्षा संपली असून काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत.

शेती ही पूर्णपणे निसर्गावर आणि हवामानावर अवलंबून असते. पाऊस कमी झाला, की नापिकी; पाण्याची कमतरता झाली, तर मोठं नुकसान. या सर्व गोष्टी लक्षात घेता केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना पीक विमा योजना आणि अनुदानाच्या माध्यमातून मदत करत असते.

2023-24 वर्षासाठीचा पिकविमा अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला तातडीने विम्याचे पैसे देण्याची मागणी केली होती. संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी माहिती दिली की, यासंदर्भात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पत्र देण्यात आले होते.

विशेष म्हणजे, केवळ 1 रुपयात पीक विमा संरक्षण मिळावे, अशी मागणीही या संघटनेने केली होती. अजूनही अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराज होते.

सरकारने जर वेळेत विम्याचे पैसे दिले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला होता की, जिल्ह्यात कोणताही शासकीय कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही. हा इशारा देणाऱ्यांमध्ये रावसाहेब लवांडे, दत्तात्रेय फुंदे, अशोक भोसले, प्रशांत भराट, अमोल देवढे, विकास साबळे आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.

या सर्व आंदोलना आणि मागण्यांमुळे अखेर सरकारने पावले उचलली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे हा लढा सुरूच राहणार असल्याचे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

Crop Insurance news आणि पिक विमा योजना संबंधित ताज्या अपडेटसाठी आमच्या ब्लॉगवर नियमितपणे भेट द्या.

Lakpati Didi Yojana: फक्त महिलांसाठी सुवर्णसंधी! 5 लाख रुपये थेट खात्यात – लखपती दीदी योजनेत अर्ज सुरू!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !