Ladki Bahin Yojana 10th Installment: लाडकी बहिन योजना 10वा हप्ता 2025 – तुमच्या खात्यात ₹1500 जमा झाले का?

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Ladki Bahin Yojana 10th Installment: लाडकी बहिन योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत मिळणाऱ्या १०व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात ₹1500 चा 10वा हप्ता जमा झाला आहे, आणि ज्यांच्याकडे आलेला नाही, त्यांच्यासाठी लवकरच ही रक्कम पाठवली जाणार आहे. त्यामुळे सर्व महिला लाभार्थींनी आपला हप्ता स्टेटस वेळोवेळी तपासावा.

लाडकी बहिन योजना – महिलांसाठी अर्थसहाय्य

ही योजना २८ जून २०२४ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केली होती. योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. दर महिन्याला ₹1500 चा हप्ता दिला जातो आणि आतापर्यंत लाखो महिलांनी याचा फायदा घेतलेला आहे.

लाडकी बहिन योजना 10वा हप्ता – नवी माहिती

या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ८वा आणि ९वा हप्ता आधीच घेतले होते, त्यांना आता १०वा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटर (X) वरून याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. ज्या महिलांना हप्ता मिळालेला नाही, त्यांच्याकडेही ही रक्कम लवकरच पोहोचणार आहे.

कोण पात्र आहे लाडकी बहिन योजना हप्त्यासाठी?

  • महिला लाभार्थींनी योजनेत अर्ज केलेला असावा.
  • वय २१ ते ६५ वर्षे दरम्यान असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये पेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील कोणीही सदस्य इनकम टॅक्स भरणारा नसावा.
  • अपात्र ठरलेल्या महिलांचे नावे योजनेतून वगळले गेले आहे.

मागचे हप्ते मिळाले नव्हते? आता मिळण्याची शक्यता

अनेक महिलांना ८वा आणि ९वा हप्ता मिळालेला नव्हता. आता १०वा हप्ता देताना मागचे हप्तेही मिळू शकतात. त्यामुळे एकाच वेळी जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेटस तपासणे खूप गरजेचे आहे.

लाडकी बहिन योजना 10वा हप्ता कसा तपासावा?

१. लाडकी बहिन योजना ची अधिकृत वेबसाइट उघडा.
२. “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
३. तुमची माहिती टाकून लॉगिन करा.
४. “Application Made Earlier” वर क्लिक करा.
५. पुढील पेजवर “₹” या चिन्हावर क्लिक करा.
६. तुमच्या खात्यात १०वा हप्ता आला आहे का, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

शेवटी महत्त्वाचं

  • लाडकी बहिन योजना 10वा हप्ता 2025 ही महिलांसाठी दिलासा देणारी मदत आहे.
  • जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल आणि अजून हप्ता मिळालेला नसेल, तर लगेचच स्टेटस चेक करा.
  • अधिकृत माहिती आणि अपडेटसाठी mahayojanaa.com वर नजरे ठेवा.

Crop Insurance News: मोठी बातमी! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात – तुमचं नाव आहे का यादीत?

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !