Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्र योजनाTrain Journey Scheme: फक्त ₹100 मध्ये पूर्ण भारताचा प्रवास! सरकारची भन्नाट योजना...

Train Journey Scheme: फक्त ₹100 मध्ये पूर्ण भारताचा प्रवास! सरकारची भन्नाट योजना सुरू

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

फक्त ₹100 मध्ये ट्रेनने पूर्ण भारतात फिरण्याची संधी मिळाली, तर कसं वाटेल? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही संधी आता प्रत्यक्षात मिळतेय. आजच्या लेखात आपण Train Journey Scheme, म्हणजेच 100 रुपये प्रवास योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे ही “Train Journey Scheme”?

ही योजना म्हणजे जागृती यात्रा 2025, जी दरवर्षी आयोजित केली जाते आणि भारतातील तरुणांना उद्योजकतेविषयी शिकवण्याचे काम करते. या ट्रेनमध्ये बसून तुम्ही 15 दिवसांमध्ये जवळपास 8,000 किलोमीटरचा प्रवास करू शकता – तेही केवळ ₹100 अर्ज शुल्कात!

जागृती यात्रा म्हणजे काय?

जागृती यात्रा ही एक खास ट्रेन आहे, जी भारताच्या विविध शहरांमध्ये फिरते आणि युवकांना उद्योजकता, समाजसेवा आणि देशाच्या विकासाबद्दल जागरूक करते.

या ट्रेनचा प्रवास दिल्लीहून सुरू होतो आणि तो पुढील शहरांमध्ये जातो – अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, मदुराई, ओडिशा आणि पुन्हा दिल्ली.

प्रवासाची वेळ आणि कालावधी

  • यात्रा प्रारंभ: 7 नोव्हेंबर 2025
  • समारोप: 22 नोव्हेंबर 2025
  • प्रवासाचा कालावधी: 15 दिवस
  • एकूण अंतर: सुमारे 8,000 किलोमीटर

कोण पात्र आहे?

  • वय 21 ते 27 वर्षे असणारे युवक
  • ज्यांना उद्योजकता, सामाजिक कार्य, किंवा देशासाठी काहीतरी करायची इच्छा आहे
  • कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीतील विद्यार्थी, स्टार्टअप फाउंडर्स, किंवा तरुण व्यावसायिक

या यात्रेचे फायदे

  • केवळ भारतदर्शन नव्हे तर उद्योजकतेबाबत व्याख्याने, कार्यशाळा, आणि नेटवर्किंग.
  • देशभरातील 500 निवडक प्रवासी एकत्र येतात.
  • शिष्यवृत्तीची संधी आणि CSR फंडिंग मार्गदर्शन मिळते.

अर्ज प्रक्रिया कशी करावी?

  1. अधिकृत वेबसाइट: www.jagritiyatra.com वर जा
  2. Apply Now वर क्लिक करा
  3. ईमेल नोंदणी पूर्ण करा
  4. ₹100 अर्ज शुल्क भरा
  5. मुख्य अर्ज फॉर्म भरून सबमिट करा
  6. पात्रता तपासल्यानंतर तुमची निवड केली जाईल

शिष्यवृत्ती योजना

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुविधा
  • अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागतो
  • गरजूंना 100% सहकार्य दिलं जातं

ट्रेन कोणकोणत्या ठिकाणी जाते?

  • प्रवास सुरू – दिल्ली
  • अहमदाबाद
  • मुंबई
  • बेंगळुरू
  • मदुराई
  • ओडिशा
  • प्रवास समाप्त – दिल्ली

काँटॅक्ट आणि अधिक माहिती

  • अर्ज लिंक: www.jagritiyatra.com
  • अर्ज प्रक्रिया सुरू आहे – लवकर करा!
  • Social Media, WhatsApp Groups वर यासंबंधित अपडेट्स मिळत राहतील.

जर तुम्हाला फिरायला आवडत असेल, नव्या गोष्टी शिकायच्यात, आणि देशासाठी काहीतरी करायचं आहे, तर ही जागृती यात्रा योजना 2025 तुमच्यासाठीच आहे. केवळ ₹100 मध्ये संपूर्ण भारतदर्शन आणि आयुष्यभराची प्रेरणा मिळवायची संधी चुकवू नका!

Borewell Yojana Maharashtra: महाराष्ट्र सरकार देणार बोरवेलसाठी ८०% अनुदान – योजना सुरू!

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !