Top 12 Government Schemes for Women in Marathi: आपण सगळ्याजणी जाणतो की पूर्वी समाजात महिलांकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. शिक्षण, नोकरी, स्वप्नं – ह्या गोष्टी काही प्रमाणात फक्त पुरुषांसाठी मर्यादित होत्या. पण आता काळ बदललाय! आजच्या स्त्रिया आत्मनिर्भर होत आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत आणि समाजात आपल्या हक्काने जगत आहेत.
सरकारही आज महिलांच्या विकासासाठी खूप साऱ्या योजना राबवतंय. काही योजना थेट आर्थिक मदत देतात, काही शिक्षणासाठी आहेत, तर काही उद्योग सुरू करायला मदत करतात. पण दुर्दैवाने अजूनही बऱ्याच महिलांपर्यंत या योजना पोहोचतच नाहीत. म्हणूनच आज आपण खास महिलांसाठी असलेल्या काही महत्वाच्या योजनांची माहिती एकत्रितपणे पाहणार आहोत.
या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्या योजनेविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच मी स्वतः एक महिला म्हणून, ह्या योजनांची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती शेअर करत आहे.
Top 12 Government Schemes for Women in Marathi
- 🔸 माझी लाडकी बहीण योजना – गरीब बहिणींसाठी विशेष मदत योजना
- 🔸 लेक लाडकी योजना – मुलींच्या जन्मानंतर आर्थिक मदतीची योजना
- 🔸 उद्योगिनी योजना – महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी
- 🔸 माझी कन्या भाग्यश्री योजना – कन्याभूमी लाभासाठी
- 🔸 विधवा पेन्शन योजना – विधवा महिलांसाठी दरमहा आर्थिक मदत
- 🔸 पिंक ई रिक्षा योजना – महिलांसाठी सुरक्षित आणि स्वावलंबी रोजगार
- 🔸 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना – महिला बचतीसाठी नवीन योजना
- 🔸 सुकन्या समृद्धी योजना – मुलींच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना
- 🔸 प्रधानमंत्री मातृ वंदन योजना – गरोदर महिलांसाठी पोषण आणि आर्थिक मदत
- 🔸 नमो ड्रोन दीदी योजना – ग्रामीण भागातील महिलांसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर
- 🔸 प्रधानमंत्री उज्वला योजना – मोफत गॅस कनेक्शन
- 🔸 मोफत सूर्य चूल योजना – स्वयंपाकासाठी सौर ऊर्जेवर चालणारी चूल
- 🔸 स्टँडअप इंडिया योजना – स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी
आजच्या लेखात आपण महाराष्ट्र व भारत सरकारच्या महिलांसाठी असलेल्या अत्यंत उपयुक्त अशा योजनांची माहिती घेणार आहोत. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी या योजना फारच उपयुक्त ठरतात. प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
१) माझी लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र सरकारची एक क्रांतिकारी योजना
माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली एक विशेष आर्थिक सहाय्य योजना आहे. ही योजना फक्त गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब महिलांसाठीच आहे. ही योजना १ जुलै २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला ₹१५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट दिले जातात. म्हणजेच एका वर्षात ₹१८,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेसाठी वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षांपर्यंत आहे.
डिसेंबर २०२४ पर्यंत २.४३ कोटी महिला लाभार्थी म्हणून नोंदवल्या गेल्या होत्या आणि आता हा आकडा २.५३ कोटींपर्यंत गेला आहे. सरकारने आतापर्यंत या योजनेचे ९ हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आणि दहावा हप्ता लवकरच येणार असल्याचे सांगितले आहे.
पात्रतेच्या अटी (Eligibility):
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे
- कुटुंबातील कोणीही शासकीय/कंत्राटी नोकरीत असू नये
- कुटुंबाकडे ५ एकरपेक्षा कमी शेती असावी
- ट्रॅक्टर सोडून इतर चारचाकी वाहन नसावे
जर आधी लाभ मिळत होता आणि आता वरील अटींमध्ये आपण बसत नसाल, तर आपल्याला योजना बंद केली जाऊ शकते. सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या ७ लाख महिलांना अपात्र ठरवले आहे.
२) लेक लाडकी योजना – मुलींचे भविष्य सुरक्षित करणारी योजना
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक सामाजिक आणि शैक्षणिक उद्दिष्ट असलेली योजना आहे, जी मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी, तसेच त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ मुलीला ५ टप्प्यांमध्ये दिला जातो, तिच्या वाढीच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आर्थिक सहाय्य केले जाते. एकूण लाभाची रक्कम ₹१ लाख १ हजार आहे.
लाभ कसा मिळतो?
- जन्मानंतर लगेच – ₹५,०००
- शाळेत प्रवेश घेतल्यावर – ₹६,०००
- सहावीमध्ये गेल्यावर – ₹७,०००
- अकरावीमध्ये गेल्यावर – ₹८,०००
- १८ वर्षाची झाल्यावर – ₹७५,०००
ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी वापरायची असून, तिच्या नावाने उघडलेल्या खात्यात जमा केली जाते. १८ वर्षांपूर्वी ही रक्कम काढता येत नाही.
३) महिला उद्योगिनी योजना – ग्रामीण भागातील महिलांसाठी व्यवसायिक संधी
महिला उद्योगिनी योजना ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांसाठी एक चांगली योजना आहे. ही योजना अशा महिलांसाठी आहे ज्या स्वतःचा लघुउद्योग सुरू करू इच्छितात आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू पाहतात.
या योजनेतून पात्र महिलांना ₹३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळते आणि त्यावर ३०% अनुदान दिले जाते. म्हणजेच तुम्हाला ₹३ लाख मिळाले, तरी परत फक्त ₹२.१० लाखच फेडावे लागतात.
पात्रता (Eligibility):
- वय – १८ ते ५५ वर्षांदरम्यान
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१.५ लाखांपेक्षा कमी असावे
- विशेष प्राधान्य – विधवा, अपंग महिला, अनुसूचित जाती-जमातीतील महिला
- कर्ज ८८ प्रकारच्या लघुउद्योगांसाठी मिळू शकते
ही योजना महिलांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
४) माझी कन्या भाग्यश्री योजना – मुलींच्या शिक्षणासाठी ठोस पाऊल
माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींचा जन्मदर वाढवण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०१६ रोजी जाहीर करण्यात आली आणि प्रत्यक्षात १ ऑगस्ट २०१७ पासून सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात एकच मुलगी आहे, त्यांना ₹५०,००० शैक्षणिक निधी दिला जातो. जर दोन मुली असतील, तर प्रत्येकी ₹२५,००० मिळतात. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी असते आणि तिच्या १८ वर्षांपर्यंत खात्यातून काढता येत नाही.
पात्रता अटी:
- पालक महाराष्ट्राचे रहिवासी असावेत
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹७ लाखांपेक्षा कमी असावे
- फक्त दोन मुलींचा जन्म झाल्यावरच शस्त्रक्रिया करून कुटुंब नियोजन केलेले असावे
- किमान १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे
ही योजना मुलींच्या शिक्षणाला आणि भविष्याला गती देणारी असून, त्यांचे सामाजिक स्थान उंचावण्यास मदत करते.
5) विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र
ही योजना विधवा महिलांसाठी आहे. पतीच्या निधनानंतर महिलांना आर्थिक मदत म्हणून दरमहा 600 रुपये पेन्शन दिले जाते. जर त्या महिलेला 18 वर्षाखालील मुलगा असेल, तर तिला दरमहा 900 रुपये पेन्शन दिले जाते.
महिला 40 ते 65 वयोगटातील असावी, तिचे वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा जास्त नसावे, आणि ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. ही योजना महिला सशक्तीकरणासाठी खूप उपयोगी आहे.
6) पिंक ई-रिक्शा योजना
महाराष्ट्र सरकारकडून फक्त महिलांसाठी सुरू झालेली ही योजना खूप उपयुक्त आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार महिला लाभार्थ्यांना 20% अनुदान देते आणि उर्वरित 70% रक्कम कर्ज स्वरूपात मिळते.
या योजनेतून महिलांना स्वतःची पिंक ई-रिक्शा घेता येते. ही योजना खास करून गरजू आणि बेरोजगार महिलांसाठी आहे. यामुळं महिला स्वावलंबी होतात आणि आपल्या कुटुंबाचे अर्थकारण सांभाळू शकतात.
7) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
ही योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाते आणि फक्त महिलांसाठीच आहे. यामध्ये महिलांनी पोस्टमध्ये खाते उघडून त्यात किमान 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये दोन वर्षांसाठी ठेवले, तर सरकारकडून 7.5% व्याजदर दिला जातो.
ही योजना कमीत कमी गुंतवणूक, अधिक फायदा देणारी आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित बनवण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे.
8) सुकन्या समृद्धी योजना
ही योजना केंद्र सरकारकडून मुलींसाठी खास बचत योजना म्हणून सुरु करण्यात आली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा भाग असलेली ही योजना मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी आर्थिक तयारी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
या योजनेत पालकांनी मुलीच्या नावे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून दरवर्षी किमान 250 रुपये जमा करावेत. कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत करता येते. 8.2% चक्रवाढ व्याज यामध्ये दिले जाते. मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर हे पैसे परत मिळतात.
9) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
ही योजना गर्भवती महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. जेणेकरून महिलांना गर्भधारणेदरम्यान योग्य पोषण मिळावे, त्यांचे आरोग्य टिकून राहावे आणि बाळाचेही पोषण योग्य प्रकारे व्हावे.
योजनेअंतर्गत पात्र महिलेला तीन टप्प्यांमध्ये एकूण 5000 रुपये दिले जातात. दुसऱ्यांदा गर्भधारणा असल्यास 6000 रुपये मिळतात. योजनेचा अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये ऑफलाइन भरावा लागतो.
10) नमो ड्रोन दीदी योजना
शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. सरकारने 15,000 महिला बचत गटांसाठी ही योजना सुरु केली आहे. योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी 80% अनुदान दिले जाते.
जर ड्रोनची किंमत 10 लाख रुपये असेल, तर महिलेला तो फक्त 2 लाखात मिळतो. महिलांना ड्रोन ऑपरेटिंगचे प्रशिक्षण आणि 15000 रुपये पगार देखील दिला जातो. महिलांनी हे ड्रोन इतर शेतकऱ्यांना भाड्याने देऊन कमाई करू शकते.
11) घरोघरी आयुष्यमान योजना
ही योजना महिलांसाठी उपयुक्त आहे कारण यामध्ये गर्भवती महिला, नवजात बालक, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना घरीच वैद्यकीय सेवा मिळते. महाराष्ट्र सरकारने ही योजना महिलांच्या आरोग्यासाठी सुरू केली आहे.
तुमच्या गावात आशा वर्कर किंवा आरोग्य सेविका यांच्यामार्फत ही सेवा दिली जाते. यामुळे महिलांना आरोग्याच्या बाबतीत वेळीच मदत मिळते आणि अचानक खर्च वाचतो.
12) उज्ज्वला गॅस योजना
गरिब महिला लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून सुरू झालेली ही योजना अजूनही 2025 मध्ये सुरु आहे. योजनेअंतर्गत बीपीएल यादीतील महिलेला फ्री गॅस कनेक्शन मिळते. स्वयंपाक करताना लागणाऱ्या धुरापासून महिलांचे आरोग्य टिकते.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी गावचे ग्रामपंचायत ऑफिस किंवा जवळचे गॅस वितरक केंद्र येथे संपर्क साधा.
निष्कर्ष
मित्रमैत्रिणींनो, या सर्व योजना महिलांसाठीच्या फ्री योजना असून त्यांचा उद्देश महिलांना स्वावलंबी, सुरक्षित आणि सक्षम बनवणे हा आहे. तुमच्याकडे पात्रता असल्यास नक्की या योजनेचा लाभ घ्या आणि इतर महिलांनाही माहिती शेअर करा. अधिक माहितीसाठी mahayojanaa.com या माझ्या ब्लॉगवर तुम्ही इतर योजनाही वाचू शकता.
धन्यवाद!
Pik Vima Manjur: पीक विमा मंजूर! शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २८५२ कोटी जमा – तुमचं नाव आहे का यादीत?