Pik Vima Manjur: पीक विमा मंजूर! शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २८५२ कोटी जमा – तुमचं नाव आहे का यादीत?

WhatsApp Group Join Now

Pik Vima Manjur: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पीक विमा मंजूर झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. अनेक महिन्यांपासून शेतकरी या निर्णयाची वाट पाहत होते. शेवटी शासनाने यासंबंधी नवीन जीआर जारी केला असून, पीक विम्याच्या रक्कम वितरणासाठी तयारी सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होणार?

महाराष्ट्र शासनाने २०२२ पासून प्रलंबित असलेली पीक विमा रक्कम आणि यंदाच्या खरीप हंगामातील रक्कम एकत्रित करून सुमारे २५५५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खरीप २०२२, रब्बी २०२२-२३, खरीप २०२३ आणि रब्बी २०२३-२४ हंगामांचा समावेश आहे.

Pik Vima Yojana 2024 – पात्रता आणि वितर

खरीप २०२४ मध्ये तब्बल १ कोटी ७१ लाख अर्ज शेतकऱ्यांकडून आले होते. त्यापैकी १ कोटी ६५ लाख अर्ज ग्राह्य धरण्यात आले. मात्र फक्त ६४ लाख शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित एक कोटी शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे फेटाळण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांना २३०८ कोटी रुपयांची विमा रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात मिळणार आहे.

Pik Vima Update 2024 – विमा कंपन्यांची भूमिका

भारतीय कृषी विमा कंपनी ही योजनेची मुख्य समन्वयक संस्था आहे. विमा कंपन्यांना सरकारकडून प्रलंबित २८५२ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता मिळाल्यानंतर, त्यांनी रक्कम वितरणाला मान्यता दिली आहे. यामुळे खरीप २०२३ आणि २०२४ मधील विमा रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

ज्यांनी खरीप २०२४ मध्ये पीक विम्यासाठी अर्ज केला होता, त्यांनी आपले बँक खाते तपासून ठेवणे गरजेचे आहे. कारण लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल. जिल्हानिहाय यादी लवकरच जाहीर होणार आहे.

Gharkul Anudan Yojana: मोफत घराची संधी! घरकुल योजनेत मोठा बदल – तुमचं नाव आहे का?

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !