Tactor Anudan Yojana: शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारतर्फे ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठं आर्थिक अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. आता तुम्ही ट्रॅक्टर घेण्यासाठी 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंतचं सबसिडी मिळवू शकता. यासाठी काय पात्रता आहे, कोण अर्ज करू शकतो, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे – याची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत.
ट्रॅक्टर अनुदान योजना संपूर्ण माहिती (Tractor Anudan Yojana 2025)
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी ही योजना खास राबवण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेचे आयोजन करत आहे, जे कृषी क्षेत्रासाठी एक मोठा आधार ठरणार आहे.
योजनेअंतर्गत गटांना मिनी ट्रॅक्टरसह (9 ते 18 HP) लागणारी उपकरणं जसे की कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर, ट्रेलर वगैरे खरेदी करता येणार आहेत. यावर सरकारकडून 90% अनुदान, म्हणजेच 3 लाख 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
कोण पात्र आहे? (Tractor Anudan Yojana Eligibility)
- अर्जदार गट हा महाराष्ट्रातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट असावा.
- गटातील 80% सदस्य हे अनुसूचित जाती/नवबौद्ध समाजाचे असणे आवश्यक आहे.
- अध्यक्ष, सचिव यांची नावे, सदस्यांची यादी आणि जात प्रमाणपत्र आवश्यक.
- अर्ज करणारा गट शेतीशी प्रत्यक्ष संबंधित असावा.
- बँक तपशील, खरेदी करावयाच्या साधनांचा अंदाजित खर्च हे सर्व कागदपत्रांसह अर्जात जोडणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2025
ही अत्यंत फायदेशीर योजना आहे. म्हणून योग्य कागदपत्रांसह वेळेत अर्ज करा.
अधिक माहिती साठी संपर्क करा
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नाशिक
नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड
कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट घ्या किंवा अधिकृत माहिती घ्या.
निष्कर्ष
Tractor Anudan Yojana 2025 ही योजना शेतकरी बचत गटांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी आता स्वतःची गुंतवणूक कमी करून अधिक उत्पादनक्षम शेती करता येणार आहे.
त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच अर्ज करा आणि सरकारच्या या ट्रॅक्टर सबसिडी योजनेचा लाभ घ्या!
Crop Insurance update: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होऊ लागली!