Sarkari Yojana For Ladies: भारत सरकार महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सक्षम करण्यासाठी अनेक फायदेशीर योजना राबवत आहे. या योजनांच्या (महिला सरकारी योजना) माध्यमातून सरकार महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने प्रेरित करत आहे. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या एका विशेष लाभदायक योजनेबद्दल माहिती देणार आहोत, जी विशेषतः महिलांसाठी आहे. या योजनेचे नाव आहे “लखपती दीदी योजना” (Lakhpati Didi Yojana).
लखपती दीदी योजना महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्जाची सुविधा देते. कसे अर्ज करायचे आणि आर्थिक पाठबळ मिळवून स्वतःला सक्षम कसे करायचे, याची माहिती देखील या योजनेद्वारे दिली जाते.
केंद्र सरकारकडून महिलांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमही राबवला जातो. या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करू शकतात आणि त्यांचे आर्थिक राहणीमान सुधारण्यात मदत मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…
Sarkari Yojana For Ladies
लखपती दीदी योजनेअंतर्गत देशातील 18 ते 50 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. मात्र, ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणीतरी सरकारी नोकरीत असेल, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही.
ज्या महिलांना या योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज हवे असेल, त्यांनी त्यांच्या बचत गटात सामील व्हावे. तसेच, त्या गटामार्फत आवश्यक कागदपत्रे आणि व्यवसायाचा आराखडा सादर करावा लागतो.
अर्ज सादर केल्यानंतर त्याची तपासणी होते. तपासणी झाल्यावर तुमच्याशी संपर्क साधला जातो. या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर अशी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.