MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2025 | 1500 रुपयांत आवडेल तेथे प्रवास! जाणून घ्या MSRTC ची जबरदस्त ‘प्रवास योजना’!

WhatsApp Group Join Now

MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2025: आजच्या गडबडीत आणि धावपळीत, ग्रामीण भागातील शेतकरी आणि नोकरी करणाऱ्या लोकांना फिरायला जाणे शक्य होत नाही. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत काही निवांत क्षण घालवण्याची इच्छा बाळगतो. मात्र, आर्थिक अडचणींमुळे हा आनंद काहीजणांना मिळत नाही. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘आवडेल तिथे प्रवास योजना’ सुरू केली आहे.

या योजनेमुळे तुम्ही महाराष्ट्रभर कुठेही फिरू शकता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (MSRTC) द्वारे राबवली जाणारी ही योजना ‘प्रवास योजना’ किंवा ‘पास योजना’ म्हणून ओळखली जाते. या योजनेत तुम्हाला फक्त ११००/- रुपयांत संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा आनंद मिळतो.

MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2025

योजनेचे नावMSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2025 (आवडेल तिथे प्रवास योजना 2025)
योजना कोणा व्दारा सुरू झालीआपले राज्य सरकार
लाभार्थीआपल्या राज्यातील सर्व नागरिक
योजनेद्वारे लाभअतिशय कमी खर्चात ७ किंवा ४ दिवसांचा पास काढून हवे तेथे प्रवास करता येणार आहे
अधिकृत वेबसाईटClick Here
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर022-23024068 / 1800221250

आवडेल तिथे प्रवास योजना 2025 उद्दिष्टे

  • आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वसामान्य लोकांचे फिरायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • एसटीने प्रवास करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • कमी खर्चात नागरिकांना विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळते.
  • या योजनेमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  1. आधार कार्ड
  2. दोन पासपोर्ट साईज फोटो

पात्रता (Eligibility):

  • प्रवास करण्यासाठी किमान १० दिवस आधी पास काढणे आवश्यक आहे.
  • पास असला तरी प्रवाशांसाठी राखीव जागा मिळणार नाही, त्यामुळे उपलब्ध जागेवर प्रवास करावा लागेल.
  • प्रवासादरम्यान पास हरवल्यास नवीन पास दिला जाणार नाही.
  • पासचा गैरवापर झाल्यास तो जप्त करण्यात येईल.
  • प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू हरवल्यास त्याची जबाबदारी महामंडळाची नसेल.
  • सातवा किंवा चौथा दिवस संपल्यानंतर प्रवास सुरू ठेवायचा असल्यास प्रवाशाने तिकीट खरेदी करावे लागेल.
  • संप किंवा कामबंद झाल्यास पासची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढवली जाईल.
  • हा पास केवळ अर्जदाराचाच वैयक्तिक उपयोगासाठी असतो; इतर कोणालाही देता येणार नाही.
  • कुटुंबातील मुलांना प्रवासासाठी पासचा लाभ घेता येईल, पण त्यांचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त आणि १२ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • प्रवाशांसाठी ३० किलो सामान, तर मुलांसाठी १५ किलो सामान सोबत नेण्याची परवानगी आहे.
  • पास फक्त ४ दिवस किंवा ७ दिवसांसाठीच उपलब्ध आहे.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही योजना प्रवासाचा आनंद आणि बचतीची संधी देणारी आहे.

आवडेल तिथे प्रवास योजना 2025 चा लाभ

पास कालावधीबस प्रकारप्रौढ (१२ वर्षांवरील सर्व)मुले (५ ते १२ वर्षे)
७ दिवसांचा पाससाधी (लालपरी, यशवंती)₹२०४०₹१०२५
शिवशाही₹३०३०₹१५२०
४ दिवसांचा पाससाधी (लालपरी, यशवंती)₹११७०₹५८५
शिवशाही₹१५२०₹७६५

आवडेल तिथे प्रवास योजना 2025 साठी अर्ज प्रक्रिया:

या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, आपल्या जवळच्या राज्य परिवहन बस स्थानकावर जावे लागेल. तिथे उपलब्ध असलेल्या अर्जाची प्रत घ्यावी. अर्ज भरताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर शुल्क भरून तुम्हाला पास मिळेल. पास मिळाल्यानंतर तुम्ही योजनेचा लाभ घेऊन तुमच्या आवडत्या ठिकाणी प्रवास करू शकता.

ही प्रक्रिया सोपी असून, राज्यातील नागरिकांसाठी प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

मित्रांनो, आवडेल तिथे प्रवास योजना 2025 बद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी तुम्ही लेखाच्या खाली तुमचे कमेंट्स लिहू शकता. तुमच्याकडे काही सूचना असतील, तर त्या देखील आम्हाला जरूर सुचवा. अशाच प्रकारच्या सरकारी योजनांसंबंधी ताज्या आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या mahayojanaa.com या संकेतस्थळाला नियमित भेट द्या. धन्यवाद!

अधिक वाचा: Ladki Bahin Yojana 7 Hafta | लाडकी बहिन योजना 7व्या हफ्त्याची रक्कम जाहीर! जानेवारी हप्ता कधी येणार?

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !