Maha Yojana Doot Registration: नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण ‘महा योजना दूत योजना’ म्हणजे काय, कुणासाठी आहे, आणि त्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती बघणार आहोत.
मुख्यमंत्री महा योजना दूत योजना माहिती, महा योजना दूत नोंदणी कशी करायची याची सर्व माहिती येथे उपलब्ध आहे.
महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील तरुण मुलं आणि मुलींसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक “योजना दूत” नेमला जाणार आहे. त्यासाठी नवीन नोंदणी सुरू झाली आहे. त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Maha Yojana Doot Registration महत्वाचे मुद्दे
📋 योजनेचे नाव | महा योजना दूत |
---|---|
👤 कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
🎯 योजनेचा उद्देश काय आहे? | राज्यातील तरुण मुला-मुलींसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देणे |
👥 लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील तरुण मुले व मुली |
💰 लाभ | १०,०००/- रु. महिना |
📝 अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Maha Yojana Doot Registration 2024 काय आहे?
महाराष्ट्र सरकार प्रत्येक गावात एक योजना दूत नेमणार आहे. जे निवडले जातील त्यांना महिन्याला १०,००० रुपये मानधन मिळणार आहे. योजना दूतांचं काम म्हणजे सर्व सरकारी योजनांची माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणे आहे. या नोंदणीसाठी तुमचं वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावं आणि तुमच्याकडे पदवी असावी. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Maha Yojana Doot Registration 2024 पात्रता
महा योजना दूत म्हणून काम करायचं असल्यास तुम्हाला खालील पात्रता पूर्ण कराव्या लागतील. तेव्हाच तुम्ही महा योजना दूत पोर्टलवर नोंदणी करू शकता.
- उमेदवाराचं वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावं.
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
- अर्जदाराला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावं आणि ते खाते आधारसोबत लिंक असावं.
Maha Yojana Doot Registration 2024 फायदे
जर तुम्ही महा योजना दूत म्हणून निवडले गेलात, तर तुम्हाला खालील फायदे मिळतील:
- प्रत्येक महिन्याला १०,००० रुपयांपर्यंत मानधन.
- समाजासाठी काम करण्याची संधी.
- प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल.
- सरकारी कामकाजाचा अनुभव.
- नवीन काम शिकून कौशल्य विकसित करण्याची संधी.
Maha Yojana Doot Registration 2024 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी:
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पदवी प्रमाणपत्र
- जीमेल खाते (आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असावा)
Maha Yojana Doot Registration 2024 नोंदणी कशी करायची:
नवीन योजना दूत नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:
सर्वात आधी ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्या, त्याची लिंक वरती दिलेली आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर, नोंदणी ऑप्शनवर क्लिक करा.
आधार क्रमांक टाका आणि ‘Verify’ ऑप्शनवर क्लिक करून आधार व्हेरिफाय करा.
‘Get OTP’ ऑप्शनवर क्लिक करा आणि ओटीपी टाका.
ओटीपी टाकल्यानंतर, सबमिट करा.
FAQ Maha Yojana Doot Registration
महा योजना दूत योजना काय आहे?
महा योजना दूत हे पद प्रत्येक ग्रामपंचायतीत ६ महिन्यांसाठी निर्माण करण्यात आले आहे. या योजनेत, निवड झालेल्या अर्जदारांना प्रत्येक महिन्याला १०,००० रुपये मानधन दिलं जाणार आहे. योजना दूतांचं मुख्य काम म्हणजे सर्व सरकारी योजनांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवणं.
योजना दूतांना किती मानधन दिलं जाणार आहे?
योजना दूत म्हणून निवड झालेल्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला १०,००० रुपये मानधन दिलं जाणार आहे.
महा योजना दूत नोंदणी कुठे करायची?
महायोजना दूत नोंदणीसाठी तुम्हाला mahayojanadoot.org या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
महा योजना दूत योजनेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
योजना दूत पदासाठी अर्जदाराने कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी, ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.