मित्रांनो, आज आपण LIC Jeevan Akshay Yojana या विशेष योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. अनेकजण विचार करत असतात की निवृत्तीनंतर महिन्याला स्थिर उत्पन्न कसं मिळेल? काम बंद झाल्यावर दर महिन्याचा पगार येत नाही आणि घरखर्च चालवणं कठीण जातं. पण आता काळजी करू नका – कारण LIC ने एक अशी योजना आणली आहे जिच्यात तुम्ही एकदाच गुंतवणूक केली, की दर महिन्याला तुम्हाला २०,००० रुपये पेन्शन मिळू शकते!
होय! ही योजना आहे एलआयसी जीवन अक्षय योजना (LIC Jeevan Akshay Yojana). ह्या योजनेत एकदाच रक्कम भरायची असते आणि मग तुम्हाला तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला ठराविक रक्कम मिळत राहते – तीही आयुष्यभर.
ही योजना नक्की आहे तरी काय?
एलआयसी जीवन अक्षय योजना ही एक वार्षिकी (Annuity) योजना आहे. यात तुम्ही एकदाच एक ठराविक रक्कम गुंतवता आणि नंतर दर महिन्याला, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेण्याचा पर्याय निवडू शकता.
या योजनेचे फायदे:
- एकदाच गुंतवणूक, आयुष्यभर उत्पन्न
- निवृत्तीनंतर खर्चाची चिंता नाही
- पेन्शन तुमच्या खात्यात दर महिन्याला जमा होते
- विविध पर्याय उपलब्ध – तुम्ही आणि तुमचा दोघेही लाभ घेऊ शकता
अर्ज कसा करायचा?
तुम्ही ही योजना ऑनलाइन LIC च्या अधिकृत वेबसाइटवरून घेऊ शकता किंवा जवळच्या LIC शाखेमध्ये जाऊनही अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक तपशील आणि एक पासपोर्ट साईज फोटो लागेल.
पात्रता:
- वय: किमान ३० वर्षांपासून ८५ वर्षांपर्यंत
- एकदाच गुंतवणूक आवश्यक (कमीत कमी रक्कम – LIC च्या अटीप्रमाणे)
ही योजना खास त्यांच्यासाठी आहे जे निवृत्तीनंतरही एक निश्चित उत्पन्नाची खात्री ठेवू इच्छितात. जर तुम्हाला वाटत असेल की “मला दर महिन्याला २०,००० रुपये हवे आहेत”, तर ही LIC Jeevan Akshay योजना नक्की तुमच्यासाठी आहे.
कोण करू शकतो LIC Jeevan Akshay योजनेत गुंतवणूक?
LIC Jeevan Akshay पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचं वय 30 वर्षांपासून 85 वर्षांपर्यंत असावं लागतं. म्हणजेच, या वयोगटातले कोणीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ही एक Single Premium, Non-linked, Non-participating, आणि वैयक्तिक वार्षिकी योजना आहे.
साध्या भाषेत सांगायचं झालं, तर एकदाच पैसे गुंतवा आणि त्यावर आयुष्यभर दर महिन्याला पेन्शन मिळवा!
या योजनेची खास गोष्ट म्हणजे – तुम्ही ही पॉलिसी एकट्याने किंवा जोडीनं (jointly) खरेदी करू शकता. आणि तुमच्या सोयीप्रमाणे मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेण्याचा पर्याय निवडू शकता.
1 लाख गुंतवा आणि मिळवा ₹12,000 पेन्शन!
या योजनेत किमान ₹1 लाख गुंतवणुकीची अट आहे. कमाल मर्यादा नाही, म्हणजे जितकी जास्त गुंतवणूक तितकी जास्त पेन्शन!
उदाहरण:
- जर तुम्ही ₹1 लाख गुंतवले, तर त्यावर ₹12,000 वार्षिक पेन्शन (म्हणजे जवळपास ₹1000 महिना) मिळू शकतं.
- पण जर तुम्हाला दरमहा ₹20,000 म्हणजेच ₹2.4 लाख वार्षिक पेन्शन हवं असेल, तर त्यासाठी सुमारे ₹40.72 लाखांची गुंतवणूक करावी लागेल.
LIC Jeevan Akshay योजना का घ्यावी?
- एकदाच प्रीमियम भरला की, लगेच पेन्शन सुरू
- निवृत्तीनंतरच्या काळात नियमित उत्पन्नाची हमी
- बाजाराच्या चढउताराचा काहीही परिणाम नाही
- पेन्शन आयुष्यभर चालतं – तुम्ही कितीही वयाचे झालात तरी!
- तुमच्या जोडीदारासाठीही पेन्शनचा पर्याय उपलब्ध
- बचतीवर चांगला परतावा – आणि तोही गॅरंटीने!
निवृत्तीनंतर कोणतंही उत्पन्न नसेल तर? LIC Jeevan Akshay सारख्या योजना तुमच्या भविष्याची आर्थिक घडी मजबूत ठेवतात. आज गुंतवा आणि उद्याचं निश्चिंत जीवन जगा!
LIC NEW SCHEME: फक्त 45 रुपये आणि मिळवा लाख रुपये! LIC ची जबरदस्त स्कीम!