Ladki Bahin Yojana Maharashtra: माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक अत्यंत उपयुक्त योजना आहे जी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि गरजू महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांच्या स्वावलंबनाला चालना देणे.
आतापर्यंत किती हप्ते मिळालेत?
या योजनेचे १२ हप्ते आधीच जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच अनेक महिलांच्या खात्यात आता पर्यंत ₹18,000 जमा झाले आहेत. परंतु काही महिलांना १२ वा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे त्यांचे पैसांचे वाट पाहणे अजूनही सुरू आहे.
१३ वा हप्ता कधी जमा होईल?
लाडकी बहीण योजना 13 वा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना मागील हप्ता मिळालेला नाही, त्यांना १३ व्या हप्त्यासोबत मागचे ₹1500 देखील मिळणार, म्हणजेच एकूण ₹3000 जमा होतील. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण सरकारकडून पात्र महिलांना एकत्र दोन हप्त्यांची रक्कम मिळणार आहे.
कोण पात्र आहे या योजनेसाठी?
माझी लाडकी बहीण योजना 2025 साठी पात्रता खालील प्रमाणे आहे:
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- घरात कोणतीही सरकारी नोकरी करणारी व्यक्ती नसावी.
- महिलेकडे चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर नसावे.
- बँक खाते आधार व मोबाईलशी लिंक केलेले असावे.
या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना दर महिन्याला ₹1500 ची आर्थिक मदत सरकारकडून मिळते.
सरकारकडून व्यवसायासाठी कर्जसुद्धा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे की, ज्या महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना सरकारकडून ₹1 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत होणार आहे आणि त्या आत्मनिर्भर बनू शकतील.
13 व्या हप्त्याची तारीख कधी जाहीर होईल?
सध्या 13 व्या हप्त्याची तारीख अजून सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु लवकरच ती अपडेट केली जाणार आहे. आपल्याला नियमितपणे mahayojanaa.com वर योजनेशी संबंधित अपडेट्स मिळत राहतील.
खात्यात पैसे आलेत का? अशी करा खात्याची तपासणी
जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचं बँक खातं आधारशी लिंक असेल, तर तुम्ही मोबाईलवरून बँक बॅलन्स तपासू शकता किंवा जवळच्या CSC सेंटर, बँकेत जाऊन खात्यात ₹1500 किंवा ₹3000 जमा झालेत का ते तपासू शकता.
माझी लाडकी बहीण योजना 2025 ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठा आधार आहे. प्रत्येक पात्र महिलेला वेळेवर पैसे मिळावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तुमचं नाव योजनेच्या यादीत आहे का, हे जाणून घ्या आणि जर १३ वा हप्ता अजून मिळालेला नसेल तर थोडी वाट पाहा – लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
Ladki Bahin Yojana New Update 2025: बहिणींना मिळणार आणखी एक गोड बातमी – आता मिळणार हे नविन फायदे!