Ladki Bahin Yojana 11th Installment | ११ व्या हफ्त्याची रक्कम या दिवशी मिळणार! लाडकी बहिण योजना धारकांसाठी मोठी बातमी!

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 11th Installment Date: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत एप्रिल महिन्यात १० वी हफ्ता वितरित झाल्यानंतर आता मे महिन्याचा ११ वा हफ्ता देण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२५ पासून हप्त्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ही महाराष्ट्र सरकारची एक महिला कल्याणकारी योजना आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आर्थिक मदत मिळते, पोषण सुधारते आणि कुटुंबातील त्यांचा दर्जा मजबूत होतो. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते.

आतापर्यंत किती महिलांना लाभ मिळाला?

आतापर्यंत या योजनेतून २ कोटी ४७ लाखाहून अधिक महिलांना ₹१५,००० चा लाभ मिळाला आहे. यामध्ये १० हफ्त्यांचे वाटप पूर्ण झाले असून, आता सरकार मे महिन्यात ११ व्या हफ्त्याचे वाटप करणार आहे.

लाडकी बहिण योजनेचा ११ वा हफ्ता कधी मिळेल?

Ladki Bahin Yojana 11th Installment Date ही २४ मे २०२५ पासून सुरू होणार आहे. हफ्ता दोन टप्प्यांत वितरित केला जाईल, म्हणजे सर्व महिलांना एकाच दिवशी रक्कम मिळणार नाही. हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि DBT पर्याय सक्रीय असणे आवश्यक आहे.

योजनेत किती रक्कम मिळणार?

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, आता काही महिलांना या योजनेतून ₹५०० मिळणार आहेत. कारण त्या महिलांना Namo Shetkari Yojana अंतर्गत आधीच ₹१००० मिळत आहे. त्यामुळे अशा महिलांना एकत्रित ₹१५०० मिळतील. ज्यांना एप्रिलचा हफ्ता मिळालेला नाही, अशा महिलांना आता मे महिन्यात ₹३००० दिले जातील. परंतु यासाठी त्या महिलांनी पात्रता निकष पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे.

पात्रता (Eligibility for Majhi Ladki Bahin Yojana):

  • महिला महाराष्ट्रची स्थायी रहिवासी असावी.
  • वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • महिला आयकरदाते कुटुंबातून नसावी.
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा कमी असावे.
  • कुटुंबाकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर चार चाकी वाहने नसावीत.
  • बँक खाते आधारशी लिंक असावे.
  • महिला संजय गांधी योजना किंवा इंदिरा गांधी पेंशन यांचा लाभ घेत नसावी.

लाभार्थी यादी (Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment List):

लाडकी बहिण योजनेची ११ वी हफ्त्याची यादी जाहीर झाली आहे. ही यादी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमातून पाहता येते.

✅ यादी कशी पाहावी:

  1. आपल्या नगर परिषद/महानगर पालिका च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “माझी लाडकी बहिण योजना यादी” पर्यायावर क्लिक करा.
  3. आपला गाव, वॉर्ड, ब्लॉक निवडा.
  4. “View List” वर क्लिक करा आणि यादी PDF मध्ये डाउनलोड करा.
  5. यादीत आपले नाव शोधा.

अर्ज स्थिती कशी पाहावी? (Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment Status)

सुमारे ५ लाख महिलांचे अर्ज राज्य सरकारने फेटाळले आहेत. आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे खालीलप्रमाणे तपासता येते:

  1. योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.
  2. “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
  3. आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाका.
  4. “Application made earlier” वर क्लिक करा.
  5. “₹” चिन्हावर क्लिक करून आपले हफ्त्याचे स्टेटस पाहा.
Ladaki Bahin May Hafta: 3,000 रुपये खात्यावर येणार! मे महिन्यात मोठी गूड न्यूज ‘लाडकी बहिणीं’ साठी! 👉👉👉Click Here

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !