Thursday, August 28, 2025
Homeमहाराष्ट्र योजनाLadki Bahin Yojana 11th And 12th Installment | तुमचं खातं तपासा! Majhi...

Ladki Bahin Yojana 11th And 12th Installment | तुमचं खातं तपासा! Majhi लाडकी बहिण योजना चा 11वा व 12वा हप्ता जमा होतोय

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Ladki Bahin Yojana 11th And 12th Installment: मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत महाराष्ट्र सरकारने एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. मे आणि जून महिन्याचे 11वा व 12वा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अपडेटनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये जमा केले जातील.

11वी आणि 12वी हप्त्याचे वितरण

माझी लाडकी बहिण योजनेच्या (ladki bahin yojana 11th and 12th installment) 11वा आणि 12वा हप्त्याचे वितरण दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

  • पहिला टप्पा: मे महिन्याचा 11वा हप्ता वटपौर्णिमेपूर्वी दिला जाईल.
  • दुसरा टप्पा: 28 जून रोजी योजना एक वर्ष पूर्ण करत असल्याने, त्या दिवशी जूनचा 12वा हप्ता दिला जाणार आहे.

पात्र महिलांना मिळणार 3000 रुपये

योजना अंतर्गत 2 कोटी 41 लाख पात्र महिलांना हे हप्ते मिळणार आहेत. प्रत्येक महिलेला एकूण 3000 रुपये दिले जातील. ज्या महिलांना याआधी 10वा हप्ता मिळाला नाही, त्यांना 3 हप्त्यांचे 4500 रुपये मिळतील.

योजना लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे?

माझी लाडकी बहिण योजनेचा (majhi ladki bahin yojana 11th installment update) लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत:

  • महिला महाराष्ट्रची रहिवासी असावी
  • वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावी
  • महिला व तिच्या कुटुंबाचे इनकम टॅक्स भरणे नसावे
  • चारचाकी वाहन नसावे (ट्रॅक्टर वगळता)
  • बँक खाते आधारशी लिंक व DBT सक्रिय असावे
  • योजना पोर्टलवर महिला अर्जदार म्हणून नाव नोंदवलेले व मंजूर असावे

अर्जाची स्थिती व क़िस्त स्टेटस कशी तपासावी?

जर तुम्हाला अजून हप्ता मिळाला नसेल, तर खालील स्टेप्स वापरा:

  1. https://mmlby.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा
  2. अर्जदार लॉगिनवर क्लिक करा
  3. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर व पासवर्ड टाका
  4. “Application Made Earlier” वर क्लिक करा
  5. “Actions” मधील रुपये चिन्हावर क्लिक करा
  6. तिथे तुमची हप्त्यांची स्थिती दिसेल

3370 कोटींचा निधी मंजूर

राज्य सरकारने या हप्त्यांसाठी 3370 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे लाभार्थी महिलांना वेळेत आर्थिक मदत मिळणार आहे. योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे आहे.

जर तुमचा अर्ज अजून मंजूर झाला नसेल किंवा हप्त्याची माहिती हवी असेल, तर तुम्ही 181 हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता.

Mahila Mofat Scheme : फक्त महिलांसाठी! दरमहा मिळणार 2000 रुपये – नवीन योजना जाहीर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !