Ladki Bahin Mobile Gift Form: सध्या इंटरनेटवर “लाडकी बहिन योजना मोबाइल गिफ्ट फॉर्म लिंक” संदर्भात मोठ्या प्रमाणात मेसेज व्हायरल होत आहेत.
या मेसेजमध्ये सांगितले आहे की महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल फोन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण, अशी कोणतीही शासकीय योजना महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली नाही.
तरीही “लाडकी बहिन योजना मोबाइल गिफ्ट”चा मेसेज का व्हायरल होत आहे, याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आणि महत्त्वाची माहिती आम्ही या लेखात देणार आहोत. कृपया काळजीपूर्वक वाचा आणि इतर महिलांमध्येही ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना याची सत्यता समजण्यास मदत होईल.
Ladki Bahin Mobile Gift Form | लाडकी बहिन योजना मोबाइल गिफ्ट
महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहिन योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जात आहेत. आतापर्यंत सर्व महिलांना लाडकी बहिन योजनेअंतर्गत एकूण ₹7500 मिळाले आहेत.
पण आता सोशल मीडियावर लाडकी बहिन योजनेअंतर्गत मोबाईल गिफ्ट मिळणार आहे असा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत आहे.
राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे या प्रकारच्या खोट्या बातम्यांच्या प्रसारामुळे मोठ्या प्रमाणात महिला Mobile Gift च्या प्रलोभनात येऊन स्कॅमच्या बळी पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सतर्क राहा! तुमच्या बँक खात्याच्या तपशीलांचा वापर करून हॅकर्स तुमचं बँक अकाउंट हॅक करू शकतात. तुमच्या खात्यात लाडकी बहिन योजनेचे पैसे येतात त्या बँकेची माहिती कोणत्याही वेबसाईटवर किंवा ॲपवर देऊ नका.
स्पष्टपणे सांगायचं झालं तर, महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहिन योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे मोफत मोबाईल वाटप केले जात नाही.
लाडकी बहीण योजना मोबाइल गिफ्ट फॉर्म ऑनलाईन अर्ज
सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत नव्याने सांगण्यात आलेल्या मोफत मोबाईल गिफ्ट संदर्भात तुमचा एक भ्रम मी दूर करू इच्छितो.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाइल गिफ्टसाठी कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म उपलब्ध नाही.
युट्युबवर वेगवेगळे व्हिडिओ देखील आले आहेत, ज्यामध्ये “लाडकी बहीण योजना मोबाइल गिफ्ट फॉर्म” संदर्भात माहिती दिली जात आहे, पण ती माहिती पूर्णपणे खोटी आहे.
त्यामुळे अशा खोट्या माहिती प्रसार करणाऱ्या व्हिडिओंपासून महिलांनी दूर राहावे.
लाडकी बहीण योजना मोबाइल गिफ्ट फॉर्म लिंक
महाराष्ट्र शासनातर्फे “लाडकी बहीण योजना मोबाइल गिफ्ट फॉर्म लिंक” सुरू केलेली नाही. यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका.
काही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट दिले आहेत, ज्यामुळे या संदर्भातील मेसेज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
राज्यातील सर्व भागात या प्रकारचे मोबाईल वाटप केले जात नाही, फक्त काही ठिकाणी आमदार स्वखर्चाने मोफत मोबाईल वाटप करत आहेत.
महाराष्ट्र शासनाने “लाडकी बहीण योजना मोबाइल गिफ्ट” संदर्भात कोणत्याही स्वरूपाची योजना सुरू केलेली नाही. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका आणि कोणत्याही वेबसाईटवर किंवा पोर्टलवर तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका.