Favarni Pump Yojana Online Apply: शेतकऱ्यांनो खुशखबर! सरकार देणार मोफत फवारणी पंप – अर्ज करा आजच!

WhatsApp Group Join Now

Favarni Pump Yojana Online Apply: शेतकऱ्यांनो, महाराष्ट्र सरकारनं तुमच्यासाठी एक भन्नाट योजना आणली आहे – Battery Favarni Pump Yojana 2025. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 100% अनुदानावर स्वयंचलित फवारणी पंप म्हणजेच बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप मोफत दिला जाणार आहे.

 Favarni Pump Yojana ची माहिती थोडक्यात:

  • योजनेचं नाव: फवारणी पंप योजना 2025
  • उद्दिष्ट: शेतकऱ्यांना आधुनिक स्वयंचलित फवारणी पंप मोफत देणे
  • लाभ: 100% अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप
  • शुभारंभ: ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2025
  • लाभार्थी: महाराष्ट्रातील भूमिधारक शेतकरी
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन – MahaDBT पोर्टलवर
  • संपर्क: 022-61316429
  • अधिकृत वेबसाइट: mahadbt.maharashtra.gov.in

फवारणी पंप योजना 2025 म्हणजे काय?

फवारणी पंप योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना मोफत Battery Favarni Pump पुरवण्यात येणार आहे. कृषी यंत्रसामग्रीचा वापर वाढवण्यासाठी आणि उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

फवारणी पंप योजना साठी पात्रता काय आहे?

  1. अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी असावा
  2. भूमिधारक असणे आवश्यक (7/12 व 8 अ उतारे आवश्यक)
  3. वैध आधार कार्ड असणे आवश्यक
  4. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांसाठी कोटेशन आणि तपासणी अहवाल (जर लागू असेल)

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे (Documents):

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ दाखला
  • जातीचा दाखला (जर लागू असेल)
  • स्वत:ची घोषणापत्र
  • बँक पासबुक / खात्याचे तपशील
  • उपकरणाचे कोटेशन व तपासणी अहवाल (जर खरेदी करत असाल तर)
  • पूर्वसंमती पत्र

Favarni Pump Yojana Online Apply कसे करावे?

  1. MahaDBT पोर्टल ओपन करा
  2. शेतकरी योजना” या पर्यायावर क्लिक करा
  3. नविन वापरकर्ता असल्यास रजिस्ट्रेशन करा व लॉगिन करा
  4. लॉगिन केल्यानंतर “कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य” या योजनेवर क्लिक करा
  5. त्यानंतर “Battery संचलित फवारणी पंप” या पर्यायावर क्लिक करा
  6. अटी व शर्ती स्वीकारून “जतन करा” बटणावर क्लिक करा
  7. अर्ज फॉर्म भरून सर्व माहिती टाका व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  8. अर्जासाठी ₹23.60 शुल्क भरा आणि त्याची पावती डाउनलोड करा

Battery Favarni Pump Yojana Application Status कसा पाहावा?

  1. MahaDBT पोर्टल वर लॉगिन करा
  2. मी अर्ज केलेल्या बाबी” वर क्लिक करा
  3. छाननी अंतर्गत अर्ज” पर्याय निवडा
  4. फवारणी पंप योजना” निवडून Status तपासा

शेतकऱ्यांनो, जर तुम्हाला Battery Favarni Pump हवे असेल आणि तुम्ही पात्र असाल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका! फवारणी पंप योजना 2025 अंतर्गत 100% अनुदानावर बॅटरीवर चालणारे पंप मिळवण्यासाठी आजच MahaDBT वर ऑनलाइन अर्ज करा.

Solar Favarni Pump Yojana 2025 सुरू! आता शेतकऱ्यांना मिळणार सोलर फवारणी पंपावर अनुदान – महाडीबीटीवर अर्ज करा!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !