ELI Yojana 2025: थेट 15 हजार पगाराची नोकरी! केंद्र सरकार देणार 3.5 कोटी रोजगार? संपूर्ण माहिती वाचा

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

ELI Yojana 2025: भारतामध्ये बेरोजगारी ही एक मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. आज कोणत्याही गावात गेलात तरी 50-60 तरुण सुशिक्षित असूनही बेरोजगार दिसतात. ही केवळ व्यक्तीगत नाही, तर देशाच्या विकासासमोरील एक मोठी अडचण आहे. ही बेरोजगारीची कीड दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ELI Yojana 2025’ (Employment Linked Incentive Scheme) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ELI योजना म्हणजे काय?

ELI Yojana 2025 ही केंद्र सरकारकडून बेरोजगार तरुणांसाठी आणलेली विशेष योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारने 3.5 कोटी खासगी नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही योजना केवळ नोकरी मिळवणाऱ्यांसाठी नाही, तर नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

या योजनेमुळे तरुणांना आर्थिक मदत आणि कंपन्यांना अनुदान मिळणार आहे, ज्यामुळे रोजगार संधी वाढतील आणि बेरोजगारी कमी होईल.

या योजनेचा फायदा कोणाला आणि कसा?

तरुणांसाठी लाभ:

  • नोकरी करणाऱ्या नव्या तरुणांना प्रत्येक महिन्याला ₹15,000 पर्यंतचा पगार मिळणार.
  • हे अनुदान दोन टप्प्यांमध्ये दिले जाईल, दुसरा टप्पा नोकरी लागल्यानंतर सहा महिन्यांनी मिळेल.
  • योजना फक्त दोन वर्षांसाठी राबवली जाणार आहे – 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027.

कंपन्यांसाठी लाभ:

  • जर कंपनीने दोन नवीन तरुणांना नोकरी दिली, तर कंपनीला प्रत्येकासाठी ₹3000 प्रति महिना मिळतील.
  • हा लाभ कंपन्यांना 2 वर्षांपर्यंत मिळेल.
  • जर ती कंपनी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातली असेल, तर अनुदानाचा कालावधी चार वर्षांपर्यंत असेल.

योजनेसाठी बजेट आणि कालावधी

  • सरकारने या योजनेसाठी ₹1 लाख कोटींचे बजेट मंजूर केले आहे.
  • ELI योजना 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल.
  • योजनेचा कालावधी 2 वर्षांचा असेल, म्हणजेच 31 जुलै 2027 पर्यंत.

नोंदणी कशी करायची?

सध्या ELI Yojana 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र 1 ऑगस्ट 2025 पासून ही प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात सुरू होणार आहे.

नोंदणीसाठी लागणारे टप्पे:

  1. अधिकृत वेबसाइटवर जा (घोषणा झाल्यावर लिंक दिली जाईल)
  2. स्वतःची माहिती भरून ऑनलाइन फॉर्म सबमिट करा
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (आधार, फोटो, शैक्षणिक पात्रता)
  4. अर्जाची पावती मिळवून ठेवा

हेच पद्धत नोकरी देणाऱ्या कंपन्यांसाठीही लागू आहे.

ELI योजना 2025 मध्ये पात्रता काय असेल?

  • अर्जदाराचा वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावा
  • तो/ती बेरोजगार असावा
  • अर्जदाराने नवीन नोकरी स्वीकारलेली असावी
  • नोकरी देणारी कंपनी मान्यताप्राप्त व नोंदणीकृत असावी

(टीप: अजूनही काही पात्रता अटी शासनाकडून घोषित व्हायच्या बाकी आहेत.)

ELI Yojana 2025 चे फायदे एका नजरेत:

लाभार्थीमिळणारा लाभकालावधी
बेरोजगार तरुण₹15,000 पर्यंत दर महिना2 वर्षे
कंपन्या₹3,000 प्रति कर्मचारी2 वर्षे (4 वर्षे मॅन्युफॅक्चरिंग साठी)

निष्कर्ष

ELI योजना 2025 ही भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले एक मोठे पाऊल आहे. या योजनेमुळे लाखो तरुणांना रोजगार मिळेल आणि कंपन्यांनाही प्रोत्साहन मिळेल. देशातील युवकांसाठी ही सुवर्णसंधी असून, तुम्ही पात्र असाल तर योजनेची अधिकृत घोषणा झाल्यानंतर लगेच अर्ज करा.

Anna Bhau Sathe Yojana 2025: फक्त मागासवर्गीयांसाठी! अण्णाभाऊ साठे योजनेतून मिळवा 7 लाख रुपये – आजच अर्ज करा!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !