देशात बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे. लाखो तरुण शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक योजना जाहीर केली आहे – ELI New Yojana 2025, म्हणजेच रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना १५,००० रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
ELI New Yojana म्हणजे काय?
ELI म्हणजे Employment Linked Incentive – रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने मंजूर केली आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे की, पुढील २ वर्षांत ३.५ कोटींहून अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
या योजनेसाठी ₹१ लाख कोटींचं बजेट निश्चित करण्यात आलं आहे. ही योजना खास करून अशा तरुणांसाठी आहे, जे पहिल्यांदाच नोकरी करणार आहेत आणि ज्यांना अद्याप कामाचा अनुभव नाही.
१५ हजार रुपये मिळवण्यासाठी काय करावं लागेल?
या योजनेअंतर्गत, जर एखादा तरुण पहिल्यांदाच नोकरीला लागतो, तर सरकार त्याच्या पहिल्या पगाराइतकी रक्कम (कमाल ₹१५,०००) प्रोत्साहन म्हणून देईल. हे प्रोत्साहन दोन हप्त्यांमध्ये मिळणार:
- पहिला हप्ता – नोकरी लागल्यापासून ६ महिन्यांनी
- दुसरा हप्ता – १२ महिन्यांनी
ही रक्कम थेट त्या कंपनीला दिली जाईल, ज्यात संबंधित तरुण काम करतो. यामुळे कंपन्यांनाही नवीन उमेदवारांना कामावर घेण्यास प्रोत्साहन मिळेल.
ELI योजना साठी पात्रता (Eligibility):
- उमेदवार भारताचा नागरिक असावा
- वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे
- पहिल्यांदा नोकरी करत असावा (कोणताही पूर्वीचा अनुभव नसावा)
- मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे
- आधार कार्ड, बँक खाते, PAN कार्ड आवश्यक
कागदपत्रांची यादी:
- आधार कार्ड
- PAN कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- नोकरीचं ऑफर लेटर (कंपनीने दिलेलं)
- बँक खाते तपशील
उद्योग आणि कंपन्यांसाठी सुद्धा मोठा फायदा:
या योजनेत उत्पादन क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. जर एखादी कंपनी नवीन उमेदवाराला २ वर्षे नोकरीवर ठेवते, तर सरकार त्या कंपनीला प्रति कर्मचारी दरमहा ₹३,००० पर्यंत मदत देईल. यामुळे कंपन्या टिकाऊ आणि स्थिर रोजगार देण्याकडे वळतील.
ELI New Scheme चे फायदे:
- बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत
- पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
- कंपन्यांना नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यास प्रोत्साहन
- रोजगार निर्मितीत मोठी वाढ
- उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती
ELI योजनेसाठी अर्ज कसा कराल?
सध्या या योजनेशी संबंधित अर्ज प्रक्रिया संबंधित पोर्टलवर लवकरच सुरू होणार आहे. यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. अर्ज सुरू झाल्यावर खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- सर्व कागदपत्रांची सoft कॉपी तयार ठेवा
- ज्या कंपनीत नोकरी लागली आहे ती नोंदणीकृत असावी
- कंपनीकडून ऑफर लेटर व जॉइनिंग डेट असलेला पुरावा अपलोड करावा
- आधार लिंक बँक खात्याची माहिती योग्य प्रकारे भरा
निष्कर्ष (Conclusion):
ELI New Scheme ही बेरोजगार तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. १५,००० रुपयांचं प्रोत्साहन आणि दीर्घकालीन नोकरीची शक्यता या योजनेमुळे तरुणांना आत्मनिर्भर होण्याची चांगली संधी मिळणार आहे. जर तुम्ही किंवा तुमचा कोणी मित्र-मैत्रीण नोकरीच्या शोधात असेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा.