Bhande Yojana Online Apply: भांडे योजना अर्जाची जबरदस्त संधी – मोबाईलवरून 5 मिनिटांत अर्ज करा!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Bhande Yojana Online Apply: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता भांडे योजना ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे करता येणार आहे. बांधकाम साईटवर सतत स्थलांतर करणाऱ्या कामगारांना जेव्हा स्वयंपाकासाठी योग्य साधनं नसतात, तेव्हा त्यांना गृहपयोगी संच योजना अंतर्गत मोफत भांडी पुरवली जातात. या योजनेचा उद्देश म्हणजे कामगारांना त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ करणे.

भांडे योजना म्हणजे काय?

ही योजना 2021 मध्ये शासनाच्या GR अंतर्गत सुरू करण्यात आली असून यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा संच दिला जातो. हा संच पूर्णपणे मोफत असून त्यामध्ये दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली भांडी असतात.

भांडे योजनेसाठी कोण पात्र?

बांधकाम कामगार भांडे योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील अटी लागू होतात:

  • अर्जदाराची बांधकाम कामगार मंडळात नोंदणी असणे आवश्यक
  • नोंदणीसाठी फक्त 1 रुपये शुल्क आहे
  • नोंदणी केल्यानंतरच गृहपयोगी संच योजनेसाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज करावा लागतो
  • अर्जासोबत आधार कार्ड, मोबाईल नंबर, नोंदणी क्रमांक, आणि अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरावी लागते

भांडे योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा?

अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी असून, आता फक्त मोबाईलद्वारे घरबसल्या अर्ज करता येतो.

अर्ज करताना लागणारी माहिती:

  • नोंदणी क्रमांक
  • नोंदणीची तारीख व नूतनीकरण तारीख
  • आधार क्रमांक
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव
  • कॅम्प निवडा (camp details)

ही सर्व माहिती भरून तुम्ही तुमचा भांडे योजना ऑनलाईन अर्ज सहजपणे सबमिट करू शकता.

जर तुम्हाला अर्ज करताना अडचण येत असेल, तर लेखाच्या शेवटी दिलेला व्हिडीओ जरूर पाहा. या व्हिडीओमध्ये संपूर्ण अर्ज प्रक्रिया पावले-पावलाने दाखवली आहे.

अनेक कामगार अजूनही वंचित का?

राज्यातील अनेक बांधकाम कामगारांनी अद्याप त्यांची नोंदणी केलीच नाही, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. याशिवाय बोगस कामगारांनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी करून लाभ घेतल्याच्या तक्रारीमुळे सरकारने दक्षता पथके तयार केली आहेत. ही पथके जिल्ह्यानिहाय काम करत असून खरी पात्रता असलेल्या कामगारांनाच लाभ मिळणार आहे.

महिला कामगारांसाठी खास संधी

महिला बांधकाम कामगार सुद्धा आता भांडे योजना ऑनलाईन अर्ज सहजपणे करू शकतात. यामुळे त्यांना देखील गृहपयोगी भांड्यांचा संच मिळू शकतो.

भांडे योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे अजून समजलं नसेल तर खाली दिलेला व्हिडीओ नक्की पाहा.

तुमचं नाव यादीत आहे का? हे जाणून घ्या आणि वेळेवर अर्ज करून गृहपयोगी संच योजना अंतर्गत तुमचा हक्काचा लाभ मिळवा.

Mofat Bhandi Yojana 2025: मोफत भांडी मिळवा! सरकारनं जाहीर केली नवी योजना – ऑनलाइन फॉर्म सुरू, लगेच अर्ज करा!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !