Friday, August 29, 2025
Homeमहाराष्ट्र योजनाBandhkam Kamgar Safety Essential Kit Yojana 2025: सरकारचा मोठा निर्णय! बांधकाम कामगारांना...

Bandhkam Kamgar Safety Essential Kit Yojana 2025: सरकारचा मोठा निर्णय! बांधकाम कामगारांना मिळणार 13 आवश्यक वस्तूंचं फ्री किट!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Bandhkam Kamgar Safety Essential Kit Yojana 2025: महाराष्ट्र शासनाने 18 जून 2025 रोजी बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Bandhkam Kamgar Yojana 2025 अंतर्गत आता सुरक्षा संच (Safety Kit) व अत्यावश्यक संच (Essential Kit) मोफत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या योजना अंमलात आणल्या जातील.

1. सुरक्षा संच योजना (Bandhkam Kamgar Safety Kit Yojana)

या योजनेचा उद्देश म्हणजे कामगारांना त्यांच्या कामात लागणाऱ्या सुरक्षेसाठी आवश्यक वस्तू मोफत देणे व अपघाताचे प्रमाण कमी करणे.

पात्रता:

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत व सक्रिय स्थितीत असलेले कामगार.

सुरक्षा किटमध्ये मिळणाऱ्या वस्तू:

  1. सेफ्टी हार्नेस बेल्ट
  2. सेफ्टी शूज
  3. इअर प्लग
  4. मास्क
  5. रिफ्लेक्टिव्ह जॅकेट
  6. हेल्मेट
  7. सेफ्टी ग्लोव्ह्ज
  8. सेफ्टी गॉगल्स
  9. मच्छरदाणी
  10. पाण्याची बाटली
  11. स्टील टिफिन डबा
  12. सौर टॉर्च
  13. ट्रॅव्हल किट बॅग

अर्ज प्रक्रिया व अंमलबजावणी:

  • कामगारांनी प्राधिकृत कार्यालयात अर्ज करावा.
  • वस्तूंची खरेदी ई-निविदा प्रणालीद्वारे होईल.
  • जिल्हा सुविधा केंद्रात किटचे वितरण व तपासणी केली जाईल.

2. अत्यावश्यक किट वाटप योजना (Essential Kit Yojana)

या योजनेचा हेतू म्हणजे कामगारांच्या घरगुती जीवनात लागणाऱ्या मूलभूत वस्तूंचा पुरवठा करून त्यांचा जीवनमान उंचावणे.

पात्रता:

  • नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगार.

अत्यावश्यक किटमध्ये मिळणाऱ्या वस्तू:

  1. पत्र्याची पेटी
  2. प्लास्टिक चटई
  3. २५ व २२ किलो धान्य साठवण कोठी
  4. ब्लँकेट, चादर, बेडशीट
  5. साखर व चहा ठेवण्याचे स्टेनलेस स्टील डबे
  6. १८ लिटर वॉटर प्युरिफायर (SS 202, 2 candles)

अंमलबजावणी प्रक्रिया:

  • पात्रता पडताळणीनंतर वस्तूंची निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी केली जाईल.
  • वितरणाची जबाबदारी जिल्हा अधिकारी व कामगार मंडळ पार पाडतील.

ही दोन्ही योजनांची सुधारित आवृत्ती आहे. त्यामुळे पात्र बांधकाम कामगारांनी लवकरात लवकर अर्ज करावा व Bandhkam Kamgar Yojana 2025 अंतर्गत मिळणाऱ्या मोफत सुरक्षा किट व अत्यावश्यक संचचा लाभ घ्यावा.

Bandhkam Kamgar Peti Yojana 2025: मिळवा खास सेफ्टी किट आणि पेटी, आजच अर्ज करा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !