Ustod Kamgar Yojana 2025: ऊसतोड कामगारांसाठी गूड न्यूज! मिळणार कामगार कार्ड आणि थेट ₹5 लाखांचा लाभ!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

Ustod Kamgar Yojana 2025: महाराष्ट्र सरकारने ऊसतोड कामगारांसाठी नवा GR जारी केला आहे, ज्याअंतर्गत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र (कामगार कार्ड) आणि ₹5 लाखांपर्यंत सानुग्रह अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

ही योजना लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबवली जाणार आहे. सध्या राज्यात १२ लाखांहून अधिक ऊसतोड कामगार कार्यरत आहेत आणि त्यांचं नोंदणीकरण आणि ओळखपत्र वाटप लवकरच सुरू होणार आहे.

कोणते जिल्हे लाभात?

या योजनेचा सर्वाधिक फायदा मराठवाडा विभागातील ऊसतोड कामगारांना होणार आहे, विशेषतः बीड, नांदेड, लातूर, जालना, अहमदनगर, परभणी, धाराशिव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांमधील कामगारांना.

कामगार कार्ड म्हणजे काय?

ऊसतोड कामगार ओळखपत्र (Labour ID card) हे बांधकाम कामगार ओळखपत्रासारखंच असेल. या कार्डाच्या माध्यमातून कामगारांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. शासनाने नोंदणी आणि कार्ड तयार करण्यासाठी एजन्सीची नेमणूक केली असून एका कार्डसाठी ₹175 खर्च होणार आहे.

ऊसतोड कामगारांना मिळणारे फायदे

ऊसतोड कामगार कल्याण योजनेअंतर्गत मिळणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत:

  • अपघाती मृत्यू झाल्यास – ₹5,00,000 सानुग्रह अनुदान
  • अपघातातून अपंगत्व आल्यास – ₹2,50,000 अनुदान
  • झोपडीत आग लागल्यास – ₹10,000 मदत
  • वैद्यकीय खर्चासाठी – ₹50,000 पर्यंत सहाय्य
  • बैलजोडी अपघात अनुदान – लहान बैलांसाठी ₹75,000 आणि मोठ्या बैलांसाठी ₹1,00,000

अर्ज करताना लक्षात ठेवाव्यात अशा अटी

  • लाभ केवळ गाळप हंगाम दरम्यान घडलेल्या घटनांसाठी लागू असेल.
  • नैसर्गिक मृत्यू, आत्महानी, दारू/अमलीपदार्थामुळे झालेल्या अपघातांना लाभ मिळणार नाही.
  • आधीच इतर सरकारी अपघात योजना लाभ घेतलेल्यांना या योजनेतून वगळण्यात येईल.

कोणते अपघात योजना अंतर्गत मान्य असतील?

  • रस्ता किंवा रेल्वे अपघात
  • विजेचा धक्का, वीज पडणे
  • औषध फवारणी करताना विषबाधा
  • जनावरांचा हल्ला, साप किंवा विंचू चावणे
  • पाण्यात बुडून मृत्यू
  • बाळंतपणातील मृत्यू

आवश्यक कागदपत्रांची यादी

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील:

  • ऊसतोड कामगार ओळखपत्र
  • मृत्यू प्रमाणपत्र
  • वारसदाराचे प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • स्थळ पंचनामा
  • नुकसान दर्शवणारा फोटो

लाभ पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, सून किंवा इतर कायदेशीर वारसदार यांनाच मिळू शकतो.

निष्कर्ष

ऊसतोड कामगार योजना 2025 ही योजना कामगारांसाठी आर्थिक सुरक्षा देणारी महत्त्वाची पायरी आहे. जर तुम्ही ऊसतोड कामगार असाल, तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि ओळखपत्र मिळवा. त्यामुळे ₹5 लाखांपर्यंतचे फायदे सहज मिळवता येतील.

Bandhkam Kamgar Laptop Yojana | बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजना 2025 बांधकाम मजुरांच्या मुलांना मिळणार मोफत लॅपटॉप, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !