Ladaki June Hafta 2025: राज्यातील लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज ३० जून रोजी लाडकी बहिणींच्या खात्यावर जूनचा हप्ता म्हणजेच ₹1500 थेट जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बहिणींच्या मनात एकच प्रश्न होता – “जून महिना संपत आला तरी अजून पैसे का आले नाहीत?” पण आता त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांनी सांगितले की, राज्य सरकारने लाडकी बहिणींसाठी एकूण 3600 कोटी रुपये DBT (Direct Benefit Transfer) द्वारे संबंधित बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले आहेत.
कोणाला मिळणार हा हप्ता?
ज्या महिलांनी लाडकी बहिण योजना 2025 अंतर्गत यशस्वीरित्या अर्ज केला आहे आणि ज्यांची पात्रता निश्चित झाली आहे, त्यांच्याच खात्यावर आजपासून जूनचा हप्ता जमा होईल. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, सरकार महिलांच्या पाठीशी आहे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. लाडकी बहिण योजना हा महिलांच्या सशक्तीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी!
तुम्ही देखील या योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. आज ३० जूनपासून पैसे बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी लगेचच तुमचं बँक खाते चेक करा – तुमच्याही खात्यात आले असतील ₹1500!