Monday, August 25, 2025
Homeकेंद्रीय योजनाLIC Vima Yojana 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! LIC विमा योजनेतून दरमहा मिळवा ₹7000, लगेच...

LIC Vima Yojana 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी! LIC विमा योजनेतून दरमहा मिळवा ₹7000, लगेच अर्ज करा

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

LIC Vima Yojana 2025: राज्यातील महिलांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. एलआयसीने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे – LIC विमा सखी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ७ हजार रुपये कमावण्याची संधी मिळणार आहे. चला पाहूया या योजनेबद्दल सविस्तर माहिती – अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, आणि पैसे कसे मिळणार याबद्दल.

LIC विमा सखी योजना म्हणजे काय?

एलआयसी विमा सखी योजना ही खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत महिलांना LIC एजंट म्हणून प्रशिक्षण दिलं जातं आणि काम सुरू असताना दरमहा ५,००० ते ७,००० रुपये स्टायपेंड मिळतो. याशिवाय विमा विक्रीवर कमिशनसुद्धा मिळतं. महिला स्वतःच्या पायावर उभं राहाव्यात, उत्पन्न मिळवावं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं हा या योजनेचा उद्देश आहे.

महिलांना नेमकं काय काम करावं लागणार?

या योजनेअंतर्गत महिला LIC विमा एजंट म्हणून काम करतील. त्यांना घराघरात जाऊन विम्याबाबत जनजागृती करायची आहे. विमा सखी ही योजना महिलांना एक स्थिर करिअर देण्यासोबतच मासिक उत्पन्नाचाही आधार देईल.

स्टायपेंड आणि कमिशन कसं मिळेल

  • पहिल्या वर्षी – दरमहा ₹7,000 स्टायपेंड
  • दुसऱ्या वर्षी – दरमहा ₹6,000 स्टायपेंड
  • तिसऱ्या वर्षी – दरमहा ₹5,000 स्टायपेंड

याशिवाय प्रत्येक विमा विक्रीवर कमिशनसुद्धा मिळेल. तीन वर्षांत एकूण ₹2,16,000 पर्यंत उत्पन्न मिळू शकतं.

पात्रता काय आहे?

  • वय किमान १८ वर्षे
  • किमान १०वी पास
  • महिलांसाठीच मर्यादित योजना
  • आधार कार्ड, बँक तपशील, १०वीचे प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा आणि फोटो आवश्यक

अर्ज कसा करायचा?

तुम्ही जवळच्या LIC शाखेत भेट देऊन अर्ज करू शकता किंवा LIC च्या अधिकृत वेबसाइटवरूनही माहिती घेऊन अर्ज करू शकता.

स्टायपेंड मिळवण्यासाठी कशा अटी पूर्ण कराव्या लागतील?

  • पहिल्या वर्षी किमान २४ पॉलिसी विक्री आणि ₹48,000 कमिशन मिळवणं आवश्यक
  • दुसऱ्या वर्षी कमीतकमी ६५% पॉलिसी सुरू असणं गरजेचं
  • तिसऱ्या वर्षीसुद्धा ६५% पॉलिसी अ‍ॅक्टिव्ह असायला हव्यात

ही योजना महिलांसाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्हाला देखील आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असेल, घरी बसून मासिक उत्पन्न मिळवायचं असेल, तर आजच LIC च्या विमा सखी योजनेत सहभागी व्हा आणि तुमचं करिअर सुरू करा!

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra: दिव्यांग बांधवांसाठी सुवर्णसंधी! मोफत ई-रिक्शा योजना सुरू, संपूर्ण माहिती येथे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

योजना ग्रुप जॉईन करा !