Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana: सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना | मुलींना मिळणार ₹10,000 शिक्षणासाठी – अर्ज करण्याची संधी मिस करू नका!

WhatsApp Group Join Now

राज्यातील मुलींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana अंतर्गत मुलींना शिक्षणासाठी दहा हजार रुपये मिळण्याची संधी आहे. आज आपण पाहणार आहोत की ही रक्कम कोणाला मिळणार, पात्रता निकष काय आहेत, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती.

Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana म्हणजे काय?

राज्यातील राज्य सरकार आणि केंद्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. यामध्ये लाडकी बहीण योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना यांसारख्या अनेक योजना आहेत, ज्यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळते. याच मालिकेत आता सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंतर्गत मुलीला 10,000 रुपये मिळू शकतात. पण हे पैसे मिळण्यासाठी कोणत्या अटी असतील, ते जाणून घेऊया.

Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana कशी कार्यान्वित होणार?

राज्यात लागू झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय ठरली. त्याच धर्तीवर श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तर्फे Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana राबवण्यात येणार आहे. न्यास व्यवस्थापन समितीने या योजनेस मान्यता दिली असून यासाठी शासनाकडून अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे.

या योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे –

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे.
मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
स्त्री सक्षमीकरणाला चालना देणे.

या अंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या बालिकांच्या नावाने 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) स्वरूपात त्यांच्या आईच्या बँक खात्यावर ठेवले जातील.

श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे सामाजिक उपक्रम

श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून समाजासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये –

➡️ गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक मदत.
➡️ विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक योजना (पुस्तक पेढी योजना).
➡️ डायलेसिस सेंटरद्वारे रुग्णांना मदत.

Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana ही सुद्धा सामाजिक बांधिलकीतून राबवली जात असून, लवकरच या योजनेसाठी पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.

ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न 133 कोटी

श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च 2025 रोजी संस्थानचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचे सन 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन 2025-26 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

न्यासाचे सर्व विश्वस्त आणि प्रशासन यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे तसेच भाविकांच्या भक्तीमय सहभागामुळे सन 2024-25 या वर्षात न्यासाचे उत्पन्न 114 कोटी रुपये अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात हे उत्पन्न विक्रमी 133 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. मागील वर्षाच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात 15% नी वाढ झालेली आहे.

आर्थिक नियोजन आणि वाढीव उत्पन्न

सन 2024-25 साठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न 114 कोटी रुपये धरण्यात आले होते. मात्र, आशिर्वचन पूजा देणगी, लाडू विक्री, नारळवडी यासंदर्भातील प्रभावी नियोजनामुळे उत्पन्न 133 कोटी रुपयांपर्यंत वाढले. ही बाब प्रशंसनीय असून, न्यासाच्या आर्थिक व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे.

सन 2025-26 साठी न्यासाने 154 कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे.

श्रीसिध्दिविनायक भाग्यलक्ष्मी योजना – नवजात बालिकांसाठी विशेष योजना

या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात 8 मार्च – जागतिक महिला दिनी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी “श्रीसिध्दिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

या योजनेद्वारे नवजात बालिकांना शैक्षणिक आणि आर्थिक मदतीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

Jivant Satbara Campaign:  1 एप्रिलपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू – शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !