Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025: एप्रिल 2016 रोजी सुरू केली. या योजनेचा लाभ राज्यातील ज्या मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी केली आहे, त्यांना मिळतो. सरकार अशा मुलीच्या नावावर 50,000 रुपये जमा करते.
जर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर पालकांनी नसबंदी केली असेल, तर दोन्ही मुलींच्या नावावर 25,000-25,000 रुपये बँकेत जमा केले जातात. या पैशाचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी होतो, ज्यामुळे त्यांना चांगले शिक्षण घेता येते. या योजनेचा लाभ फक्त एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच मिळतो.
योजनेच्या नियमांनुसार, पहिल्या मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक आहे, आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सहा महिन्याच्या आत नसबंदी करावी लागते. पूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळायचा, ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत होते. मात्र, आता हा लाभ वार्षिक उत्पन्न साडेसात लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबांनाही उपलब्ध आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे मुख्य उद्दिष्ट मुलींच्या शिक्षणात आणि आरोग्यात सुधारणा करणे, त्यांना आर्थिक मदत करणे आणि स्त्रीभ्रूणहत्या थांबवणे हे आहे. सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समानतेच्या दृष्टीने ही योजना सुरू केली आहे.
Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025
योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना |
---|---|
कधी सुरू झाली | 1 एप्रिल 2016 |
कोणाला होणार लाभ | राज्यातील प्रत्येक मुलीला जीचा जन्म 1 ऑगष्ट 2017 नंतर झालेला आहे |
रक्कम | 50,000 रुपये |
कधी मिळते रक्कम | मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर |
उद्देश | मुलींना उच्च शिक्षण देणे |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकारने |
अधिकृत वेबसाइट | https://womenchild.maharashtra.gov.in |
माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्टे
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 महाराष्ट्रात सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील मुलींबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलणे. मुलगी जन्माला आली तर ती आनंदाने स्वीकारावी, तिच्या जन्माचा सण साजरा करावा, हे लोकांना पटवून देणे हा योजनेचा उद्देश आहे. जसा मुलगा जन्माला आल्यावर आनंदाने साजरा करतात, तसाच आनंद मुलींच्या जन्मासाठीही व्यक्त केला पाहिजे.
या योजनेद्वारे मुलगी ही मुलाच्या तोडीस तोड महत्त्वाची आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलगी जन्माला आली म्हणजे आई-वडिलांसाठी ओझे नव्हे, तर ती एक संधी आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे स्वरूप
मुलींना स्वतंत्र आणि सन्मानाने जगता यावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र सरकारने ही योजना राज्यात राबवली आहे. केंद्र सरकारच्या योजनेत देशातील 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, सांगली, कोल्हापूर आणि उस्मानाबाद या 10 जिल्ह्यांचा समावेश होता.
या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने “सुकन्या योजना” सुरू केली आणि त्यानंतर काही बदल करून “माझी कन्या भाग्यश्री योजना” राबवायला सुरुवात केली. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे आणि गरीब कुटुंबांना (दारिद्र्य रेषेखालील) तसेच पांढऱ्या रेशनकार्डधारक कुटुंबांनाही याचा लाभ मिळतो.
योजनेनुसार, मुलगी सहा वर्षांची झाल्यावर तिच्या खात्यात व्याजासह पहिली रक्कम जमा केली जाते. त्यानंतर ती बारा वर्षांची झाल्यावर दुसऱ्यांदा व्याजासह रक्कम तिच्या खात्यात जमा होते. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला संपूर्ण रक्कम मिळते.
या योजनेसाठी बँकेत मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने संयुक्त बचत खाते (जॉईंट सेविंग अकाउंट) उघडले जाते. सरकारकडून रक्कम थेट या खात्यात जमा केली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीने किमान दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे नियम
माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींच्या जन्माबद्दल सकारात्मक विचार वाढवण्यासाठी, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी, त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी आणि मुलींच्या अधिकारांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश मुलींना मुलांसारखा दर्जा देणे आणि बालविवाह थांबवणे आहे.
योजनेचे नियम:
- या योजनेचा लाभ बीपीएल (दारिद्र्य रेषेखालील) आणि एपीएल (पांढरे रेशनकार्डधारक) कुटुंबांना मिळतो.
- कुटुंबात दोन मुली जन्माला आल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळेल. एका मुला आणि मुलीच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ नाही.
- मुलीचे वडील महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी असावे.
- योजनेसाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर, ती अविवाहित आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसूतीत दोन्ही मुली जन्माला आल्यास त्यांना दुसऱ्या प्रकारचा लाभ मिळेल. कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास ती मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते, मात्र तिचे वय सहा वर्षांच्या आत असावे.
- बालगृहातील मुलींनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- प्रकार एकचा लाभार्थी कुटुंब मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, तसेच प्रकार दोनमध्ये कुटुंबाने दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे.
मुलीच्या वयाच्या 18 वर्षी तिला एक लाख रुपये मिळणार आहेत. त्यातील 10,000 रुपये कौशल्य विकासासाठी वापरावे लागतील. यामुळे मुलीला रोजगार मिळेल आणि स्वतःचा उत्पन्न स्रोत निर्माण होईल.
जो कुटुंबाचा जनधन खाते आहे, त्यांना या योजनेचा फायदा आपोआप मिळेल. जर मुलीचा वय 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आधी विवाह झाला तर त्याचा लाभ तिच्या आई-वडिलांना मिळणार नाही आणि रक्कम राज्य सरकारच्या नावे जमा केली जाईल.
योजनेचा लाभ:
पहिल्या प्रकारात कुटुंबातील एक मुलगी जन्माला आल्यानंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर 50,000 रुपये जमा केले जातात. सहा वर्षांनी ती मुलगी फक्त व्याजाची रक्कम काढू शकते. बारा वर्षांनी ती मुलगी पन्नास हजाराच्या व्याजासह 50,000 रक्कम काढू शकते. अठराव्या वर्षी पूर्ण रक्कम मिळते.
दुसऱ्या प्रकारात दोन मुली जन्माला आल्यावर 50,000 रुपये रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाते. सहा वर्षांनी त्या रकमेवर व्याज मिळते. बारा वर्षांनी पुन्हा व्याज मिळते आणि अठराव्या वर्षी संपूर्ण रक्कम मिळते.
कागदपत्रे:
- लाभार्थी महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र.
- आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, मोबाइल नंबर.
- मुलीचे आणि आईचे संयुक्त बचत खाते पासबुक.
योजनेची कार्यपद्धती:
योजनेसाठी, मुलीच्या जन्माची नोंद गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेत केली जावी. जन्म नोंदणी झाल्यानंतर अंगणवाडीत अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. अर्ज बालविकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, किंवा विभागीय आयुक्त कार्यालयात मोफत उपलब्ध असतात. अंगणवाडी सेविका अर्ज मुख्य सेविकीकडे देऊन तपासणी करून मुलीला योजनेचा लाभ देतात.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 चा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला https://womenchild.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्जाचा फॉर्म मिळेल. तो फॉर्म डाऊनलोड करा आणि त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात सादर करावा लागेल. अशा प्रकारे, तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ सहज घेऊ शकता.