Gas Cylinder Price Cut New Year 1 January 2025: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत!

WhatsApp Group Join Now

Gas Cylinder Price Cut New Year 2025: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. 1 जानेवारी 2025 रोजी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (19 किलोग्रॅम) किमतींमध्ये 14.50 रुपयांची कपात केली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांना आर्थिक फायदा होणार आहे.

दिल्लीमध्ये आता व्यावसायिक गॅस सिलिंडर 1804 रुपयांना मिळेल, मुंबईत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये, आणि कोलकातामध्ये 1911 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. यापूर्वी दिल्लीमध्ये या सिलिंडरची किंमत 1818.50 रुपये होती.

Gas Cylinder Price Cut New Year 1 January

तथापि, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये आहे, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये, आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल मार्च 2024 मध्ये झाला होता, तेव्हा दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर मात्र किमती स्थिर आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी खर्चात घट होणार आहे, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

अधिक वाचा: Spray Pump Subsidy Apply Online: स्प्रे पम्प मशीनवर 2500 रुपये सवलत मिळवण्यासाठी त्वरित करा ऑनलाइन अर्ज!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !