Divyang e Rickshaw Yojana 2025: दिव्यांगांना म्हणजेच अपंग व्यक्तींना मोफत ई-रिक्षा मिळणार आहे. यासाठी जो फॉर्म आपण भरला होता, त्यातली निवड केली आहे. ई-रिक्षा म्हणजेच फिरते दुकान, हे वितरण सुरू होणार आहे. त्याची यादी तयार झाली आहे. ज्यांचं नाव या यादीत आहे, त्यांनी त्यांचा नंबर तपासावा. या पोस्टमध्ये आपण ही यादी कशी डाउनलोड करायची आणि आपलं नाव कसं तपासायचं हे पाहणार आहोत. अशी महत्वाची माहिती आपल्याला अधिक मिळत राहील. पोस्ट शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या मित्रांना ही यादी शेअर करा.
Divyang e Rickshaw Yojana 2025
योजनेचे नाव | दिव्यांग ई रिक्षा योजना 2025 |
---|---|
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | राज्य सरकार |
योजनेचा उद्देश काय आहे? | दिव्यांगांना म्हणजेच अपंगांना मोफत ई रिक्षा उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | राज्यातील दिव्यांग नागरिक |
लाभ | मोफत ई-रिक्षा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://evehicleform.mshfdc.co.in/ |
दिव्यांग ई-रिक्षा योजना 2025 काय आहे?
दिव्यांग व्यक्तींना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण अनुकूल फिरत्या वाहनावर आधारित दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) साठी 3.75 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी संबंधित संस्थेने खालील गोष्टी पार पाडाव्यात:
- वाहनाची देखभाल आणि दुरुस्ती करणे.
- दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे.
- वाहनाची प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कडून नोंदणी करणे.
- दिव्यांग लाभार्थ्यांसाठी परवाना मिळविणे आणि परवाना नाकारल्यास, त्यांचे वाहन चालवणारे सामान्य व्यक्तीला परवाना मिळवून देणे.
- वाहनाचा विमा उतरविणे.
तसेच संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीकडून फिरत्या व्यवसायाचा परवाना मिळवणे, समन्वय आणि नियंत्रणासंबंधी इतर कार्ये पार पाडावी लागतील. संबंधित संस्थेची कार्यप्रणाली सहपत्र-ब मध्ये दिली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाईल.
दिव्यांग ई-रिक्षा योजना 2025 यादी कशी डाऊनलोड करावी?
- मित्रांनो, यादी डाऊनलोड करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे.
- evehicleform.mshfdc.co.in या वेबसाइटवर जा.
- येथे तुम्हाला “एप्लीकेशन स्टेटस चेक करा” आणि एक नोटीस दिसेल.
- यादी डाऊनलोड करण्यासाठी, “See Beneficiary List” हा पर्याय उजव्या बाजूला दिसेल. त्यावर क्लिक करा.
- “Select Division” मध्ये तुम्ही कोठल्या डिव्हिजनमध्ये येता ते सिलेक्ट करा. उदाहरणार्थ: कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर इत्यादी.
- त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा.
- “View” बटनावर क्लिक करा आणि थोडं थांबा.
दिव्यांग ई-रिक्षा योजना 2025 यादी
यानंतर तुम्हाला यादी दिसेल, ज्यामध्ये त्यांना ई-रिक्षा मिळणार आहे त्यांची नावे दाखवली जातील. यादीतील सर्व नावे 100% दिव्यांग व्यक्तींची आहेत, त्यामुळे इतरांची निवड अजून झालेली नाही. दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य दिलं आहे.
दिव्यांग ई-रिक्षा ई-वाहन अर्ज 2025 कसा करा
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी हरित उर्जेवर चालणारे पर्यावरण अनुकूल फिरते दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) देण्याबाबतची योजना दिनांक १०.०६.२०१९ रोजी शासनाने मंजूर केली आहे.
योजनेकरिता एकूण ४५,३८९ अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत. दिव्यांग व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. द्वारा केली आहे.
शासन निर्णयानुसार, १००% दिव्यांगत्व असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले आहे. सन २०२३-२०२४ मध्ये ६६७ दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
पात्रतेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. उर्वरित दिव्यांग अर्जदारांचे अर्ज २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात वर्ग करण्यात येतील. त्यासाठी त्यांना नवीन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
केवळ, ज्यांनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत, त्यांना ०१.०४.२०२४ पासून https://evehicleform.mshfdc.co.in या लिंकवर अर्ज सादर करावा लागेल.
अधिक वाचा: Lic Vima Sakhi Yojana: LIC विमा सखी योजना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळवा