Bandhkam Kamgar Home Loan Yojana | बांधकाम कामगारांसाठी मिळणार घरकर्ज आणि ₹2 लाखांचे अनुदान!

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
YouTube Subscribe

नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो! जर तुम्ही एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमचे स्वतःचे पक्के घर बांधायचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! कारण महाराष्ट्र सरकारने Bandhkam Kamgar Home Loan Yojana 2025 अंतर्गत तुम्हाला घरकर्ज आणि त्यावर अनुदान देण्याची योजना सुरु केली आहे.

बांधकाम कामगार घरकुल योजना महाराष्ट्र 2025 – योजना काय आहे?

सध्याच्या वाढत्या महागाईत सर्वसामान्य कामगारासाठी स्वतःचे घर बांधणे हे एक स्वप्नच वाटते. पण आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरकारकडून ₹6 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार असून, त्यावर थेट ₹2 लाखांचे अनुदान मिळणार आहे. म्हणजे कर्ज घ्या ₹6 लाख आणि फक्त ₹4 लाख परत करा – हेच आहे या योजनेचे खास वैशिष्ट्य!

योजनेचा मुख्य उद्देश

बहुतांश बांधकाम मजूर गाव सोडून शहरात येऊन झोपडपट्ट्यांमध्ये किंवा पालामध्ये राहतात. या मजुरांना सुरक्षित आणि मजबूत घर मिळावे, त्यांची जीवनशैली सुधारावी, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. “घर ही मूलभूत गरज आहे आणि त्यावरचा खर्च सरकार उचलणार आहे!”

Bandhkam Kamgar Home Loan Yojana पात्रता निकष

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे अनिवार्य आहे.
  • वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • मागील वर्षभरात किमान 90 दिवस बांधकाम मजुर म्हणून काम केलेले असावे.
  • राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजूर झालेले असावे.

आवश्यक कागदपत्रांची यादी

  • आधार कार्ड व पॅन कार्ड
  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • कामगार ओळखपत्र (ID)
  • 90 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • बँक खातेझेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजुरीचा पुरावा
  • स्वयंघोषणापत्र

या योजनेचे फायदे काय?

  • स्वतःचे घर बांधण्यासाठी ₹6 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध
  • त्यावर थेट ₹2 लाखांपर्यंत अनुदान मिळणार
  • कर्जावर व्याज नाही (सवलतीच्या अटी)
  • कामगारांच्या जीवनमानात सुधारणा
  • सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा, आणि घराचा हक्क

Bandhkam Kamgar Home Loan Yojana अर्ज कसा कराल?

Step-by-step प्रक्रिया:

  1. राष्ट्रीयकृत बँकेत कर्जासाठी अर्ज करा आणि कर्ज मंजुरी मिळवा.
  2. https://mahabocw.in या वेबसाइटवर जा.
  3. कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. ऑनलाइन फॉर्म भरून अर्ज सबमिट करा.
  5. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल.

निष्कर्ष – आता घराचे स्वप्न पूर्ण होणार!

Bandhkam Kamgar Home Loan Yojana Maharashtra 2025 ही बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे. ज्यामुळे हजारो मजुरांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळू शकते. आजच अर्ज करा आणि आपले घरकुलाचे स्वप्न पूर्ण करा!

मुलींचे शिक्षण आता पूर्णपणे मोफत – ‘Girls Education Scheme Maharashtra 2025’ अंतर्गत सरकारचा मोठा निर्णय!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !