Sharad Pawar Gram Samriddhi Yojana: मित्रांनो, आज आपण राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचा उद्देश, फायदे, पात्रता आणि इतर संबंधित माहिती या पोस्टमध्ये दिली आहे. तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा, जेणेकरून तुम्हाला या योजनेविषयी कोणतीही शंका राहणार नाही.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana
📝 योजनेचे नाव | शरद पवार ग्राम समृद्धी योजना |
---|---|
🛠️ कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | राज्य सरकारद्वारे |
🎯 योजनेचा उद्देश काय आहे? | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा व खेड्याचा विकास करणे |
👥 लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक |
💰 लाभ | विविध व्यवसायांसाठी अनुदान दिले जाते |
📄 अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 काय आहे?
ही योजना माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२ डिसेंबर २०२० रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना गाई आणि म्हशींसाठी गोठा आणि शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्याचा शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेवर चर्चा करण्यात आली.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून 2024 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध करणे.
“मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध” या ध्येयाच्या दिशेने चार वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतील. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला:
- गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे
- शेळीपालन शेड बांधणे
- कुक्कुटपालन शेड बांधणे
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला जाईल.
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन कायमस्वरुपी मत्ता निर्माण करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आणि कामाअभावी होणारे स्थलांतर थांबवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या कामांसाठी आवश्यक असणारे 60:40 अकुशल-कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांचे संयोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग खुले होईल आणि ते लखपती बनतील.
🎯 काम | 💰 अकुशल खर्च | 💼 कुशल खर्च | 📊 एकूण खर्च |
---|---|---|---|
गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा | ₹6,188/- (8%) | ₹71,000/- (92%) | ₹77,188/- (100%) |
शेळीपालन शेड बांधणे | ₹4,284/- (8%) | ₹45,000/- (92%) | ₹49,284/- (100%) |
कुक्कुटपालन शेड बांधणे | ₹4,760/- (10%) | ₹45,000/- (90%) | ₹49,760/- (100%) |
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग | ₹4,046/- (38%) | ₹6,491/- (62%) | ₹10,537/- (100%) |
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 पात्रता
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा आवश्यक आहे.
- अर्जदार ग्रामीण भागात राहणारा आणि शेतीचा व्यवसाय करणारा असावा लागतो.
अनुदानासाठी उपलब्ध क्षेत्रे
- कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे
- गाय व म्हशींना गोठा बांधणे
- शेळी पालनासाठी शेड बांधणे
- भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा उद्देश
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना थंडी, ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळेल. तसेच, शेतकऱ्यांना इतर जोडधंदे सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 फायदे
- महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
- गाई, म्हशी, शेळ्या व मेंढयांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
- योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
- ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जातीचा दाखला
- जन्माचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
- पूर्वीच्या कोणत्याही पशुपालन योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे घोषणापत्र
- लघु धारक प्रमाणपत्र
- कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र
- शेडसाठी बजेट जोडणे अनिवार्य आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2024 अर्ज प्रक्रिया
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल. तिथून अर्ज घेऊन, आवश्यक माहिती भरून कागदपत्रे जोडून अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल. अर्जाची पडताळणी करून ग्रामपंचायतीमध्ये जमा केला जातो आणि अर्जदाराला पावती दिली जाते.
महत्वाची माहिती
योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी अनुदान मिळेल. अनुदानाची रक्कम D.B.T. च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
सारांश
तर मित्रांनो, शरद पवार ग्राम समृद्धी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण दिली आहे. तुम्हाला काही शंका असल्यास, कृपया कंमेंट करा. आम्ही तुमच्या शंकांचे निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तुम्हाला ही पोस्ट आवडली असल्यास, कृपया तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.