Free Internship Programe For ST Candidates: महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), मुंबई आणि MAITRI, मुंबई यांच्या सहकार्याने भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना अंतर्गत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील तरुणांसाठी १८ दिवसीय मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम (REDP) आयोजित करण्यात आला आहे.
Free Internship Programe For ST Candidates | कार्यक्रमाची प्रमुख माहिती
कालावधी: ०६ मार्च २०२५ ते २४ मार्च २०२५
निवड मुलाखत: ०५ मार्च २०२५ | सकाळी ११:०० वाजता
स्थान:
जी.डी. आंबेकर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा, परेल, मुंबई-१२
कार्यक्रमाचे उद्दीष्ट:
हा मोफत निवासी कार्यक्रम अनुसूचित जमातीतील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि मार्गदर्शन देण्यासाठी आहे. या प्रशिक्षणाद्वारे तुम्हाला व्यवसाय संधी, मार्गदर्शन, आणि आवश्यक कौशल्यांबद्दल सखोल माहिती मिळेल.
कोण अर्ज करू शकतो? (पात्रता व अटी)
वय: १८ ते ५० वर्षे
शिक्षण: किमान ७ वी पास
रहिवासी अट: उमेदवार १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा
महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य
निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारे
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- जातीचा दाखला
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- मार्कशीट
- पॅन कार्ड
- २ पासपोर्ट साईझ फोटो
- वरील सर्व कागदपत्रांच्या दोन झेरॉक्स प्रती
कार्यक्रमाचे फायदे:
पूर्णपणे मोफत प्रशिक्षण – कोणतेही शुल्क नाही
व्यवसाय प्रशिक्षण आणि मार्गदर्शन – अनुभवी तज्ज्ञांकडून
नेटवर्किंग संधी – व्यावसायिकांसोबत संवाद
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत
नोंदणी करा:
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
📲 श्री. रवींद्र दोडिये: ८०८०२२९२२७
📲 श्री. प्रथमेश सुतार: ८०९७४३१३७९
ही सुवर्णसंधी दवडू नका! उद्योजकतेचा प्रवास सुरू करण्यासाठी आजच नोंदणी करा!
Ladki Bahin Yojana New Update: आता अंगणवाडी सेविका येणार घरी, मिळेल थेट लाभ!