Ahilyadevi Mahamesh Yojana: अहिल्यादेवी योजना 2025 मोठ्या संधीसाठी अर्ज कसा करा? ऑनलाइन फॉर्म भरण्याची सर्व माहिती!

WhatsApp Group Join Now

Ahilyadevi Mahamesh Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण ‘अहिल्यादेवी होळकर योजना’ आणि ‘राजे यशवंतराव होळकर महामेश योजना 2024’ बद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेंतर्गत विविध 18 योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये शेळी-मेंढी वाटप योजना, जागा खरेदीसाठी अनुदान, कुकुटपालनासाठी अनुदान, आणि चराई अनुदान यांचा समावेश आहे. या योजनांची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे. चला, तर मग या अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती आपण पाहूया.

अहिल्यादेवी योजना आणि राजे यशवंतराव होळकर महामेश योजना 2025

महाराष्ट्रातील मेंढी आणि शेळी विकास महामंडळ लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. ‘राजे यशवंतराव होळकर महामेश योजना’मध्ये शेळी-मेंढी वाटप योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, जागा खरेदी अनुदान, कुकुटपालन यांसारख्या 18 योजनांचा समावेश आहे.

या योजनांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2024 आहे. अर्जाची पावती आणि इतर कागदपत्रे सबमिट करण्याची सुविधा अंतिम तारखेच्या नंतर उपलब्ध होईल.

योजना कोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहे?

राजे यशवंतराव होळकर महामेश योजना

राज्यातील मुंबई आणि मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांसाठी उपलब्ध आहे. तथापि, सन २०२४-२५ करिता महामेश योजनेतून घटक क्रमांक १ ते १३ साठी पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, आणि गोंदिया जिल्ह्यांना लक्षांक नाही. तसेच घटक क्रमांक १४ व १५ साठी यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, नागपूर, अकोला, वाशीम, वर्धा, भंडारा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, आणि गोंदिया जिल्ह्यांना लक्षांक नाही.

चराई अनुदान योजना

राज्यातील मुंबई आणि मुंबई उपनगर या २ जिल्ह्यांखेरीज उर्वरित ३४ जिल्ह्यांसाठी लागू आहे.

शेळी-मेंढी पालनासाठी १ गुंठा जागा खरेदी योजना

या योजनेत मुंबई आणि मुंबई उपनगर या २ जिल्ह्यांखेरीज उर्वरित ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळेल.

परसातील कुकुट पालन योजना

राज्यातील मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांखेरीज, उर्वरित ३४ जिल्ह्यांतील महागनगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, आणि कटक मंडळे वगळता इतर भागासाठी लागू आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पात्रता निकष

  1. अर्जदाराचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक आणि 60 वर्षांपेक्षा कमी असावं.
  2. अर्जदार भटक्या जमाती (NTC) प्रवर्गातील असावा.
  3. एका कुटुंबातील फक्त एक व्यक्ती अर्ज करू शकते.
  4. अपंगांसाठी वेगळी सोय असून, त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
  5. मेंढ्या आणि कुक्कुटपालनासाठी अर्ज करताना, अर्जदाराकडे योग्य प्रमाणात पशुधन असणं आवश्यक आहे.

महामेश योजनेसाठी कोण पात्र नाही?

  1. भटक्या जमातीच्या धनगर आणि तत्सम जमाती व्यतिरिक्त इतर सर्व जमातींच्या सदस्यांना अर्ज करता येणार नाही.
  2. मुंबई आणि मुंबई उपनगर येथील व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत.
  3. 18 वर्षांखालील आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत.
  4. एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती अर्ज करू शकत नाहीत.
  5. सरकारी / निमसरकारी / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत असलेल्या व्यक्तीला अर्ज करण्याचा अधिकार नाही.
  6. ज्यांना या योजनेतून आधी लाभ मिळालेला आहे, अशा लाभधारकांना पुनः अर्ज करता येणार नाही.
  7. ज्यांच्याकडे स्व मालकीची 1 गुंठा जागा नाही, त्यांना काही योजनांमध्ये अर्ज करता येणार नाही.
  8. ज्यांच्याकडे 20 पेक्षा कमी मेंढ्या आहेत, त्यांना चराई अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
  9. जे लोक मेंढपाळ कुटुंबातील शेतजमिन असलेल्या कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना जागा खरेदी अनुदान मिळणार नाही.

बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्या योजनेकरिता पात्र?

भटक्या जमाती (भ-जक) सदस्य असलेल्या बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना फक्त महामेश योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता आहे.

अर्जदार कोणत्या घटकांसाठी एकत्रित अर्ज करू शकतो?

  1. घटक १ ते १५ मध्ये अर्जदाराने एका घटकाचा लाभ घेतल्यास, इतर घटकांचा लाभ घेता येणार नाही.
  2. घटक ३ ते ७ मध्ये अर्जदार एका घटकाचा लाभ घेतल्यास, घटक ८ ते ११ आणि घटक १२ व १३ यांचा लाभ घेता येईल.
  3. मेंढ्यांसाठी चराई अनुदान योजनेत किमान 20 मेंढ्या असलेल्या कुटुंबाला लाभ मिळेल.
  4. भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील एका सदस्याला जागा खरेदी अनुदान मिळेल.
  5. कुक्कुटपालन योजनेत अर्जदार महापालिका / नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्राबाहेर असावा लागेल.

Ahilyadevi Mahamesh Yojana कोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहे?

  1. राजे यशवंतराव होळकर महामेश योजना
    मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता, उर्वरित ३४ जिल्ह्यांसाठी लागू आहे.
    (सन २०२४-२५ साठी काही जिल्ह्यांना लक्षांक नाही.)
  2. चराई अनुदान योजना
    मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता, ३४ जिल्ह्यांसाठी लागू आहे.
  3. शेळी-मेंढी पालनासाठी १ गुंठा जागा खरेदी योजना
    मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता, उर्वरित ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी लागू आहे.
  4. कुक्कुट पालन योजना
    मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता, महागनगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, आणि कटक मंडळे वगळता इतर जिल्ह्यांसाठी लागू आहे.

अहिल्यादेवी योजना महामेश योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड क्रमांक
  • बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड

अहिल्यादेवी महामेश योजना 2024 ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महामेशच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अर्ज भरण्याच्या काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्या:

  • वेबसाईट लिंक: महामेश वेबसाइट
  • अर्ज ऑनलाइन आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे भरता येईल.
  • अर्ज भरण्यापूर्वी सूचनांचे वाचन करा.
  • वैयक्तिक माहिती भरताना, सर्व माहिती अचूक आणि पूर्ण द्या.
  • आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी नमुने उपलब्ध आहेत.
  • आधार कार्ड, रेशन कार्ड क्रमांक, वय, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, IFSC कोड यासारखी माहिती अचूक भरा.
  • अर्जदाराची माहिती भरल्यानंतर, “सबमिट करा” या ऑप्शनवर क्लिक करा.

अधिक वाचा: Ladka Bhau Yojana Online Apply: घरबसल्या 10 हजार रुपये दरमहिना मिळवा, अर्ज कसा करा?

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !